सावंतवाडीत ‘कही खुशी, कही गम’

सावंतवाडीत ‘कही खुशी, कही गम’

Published on

97356

सावंतवाडीत ‘कही खुशी, कही गम’

प्रभाग आरक्षण ः दिग्गज इच्छुकांना बसला फटका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः येथील पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. पालिकेच्या सभागृहात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढली. पालिकेचे नगराध्यक्षपद आधीच सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाले असल्याने आज उर्वरित २० नगरसेवकांच्या जागांसाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीत राजकीय गोटात ‘कही खुशी, कही गम’ अशी संमिश्र परिस्थिती पहायला मिळाली. कारण, अनेक जुन्या-जाणत्या इच्छुकांना आरक्षणाचा फटका बसला आहे.
प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंदकर यांनी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली. यावेळी प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जान्हवी कमळकर, राक्षी वेल्हाळ, उत्कर्ष दळवी, चैतन्य राऊळ या राणी पार्वती देवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या काढून ही सोडत निश्चित केली. ​या दहा प्रभागांमधून २० जागांसाठी आरक्षणाची घोषणा झाली. यात प्रभाग १० हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. उर्वरित प्रभागांचा विचार केल्यास प्रभाग १, प्रभाग २ आणि प्रभाग ९ मधून नागरिकांचा मागास प्रवर्गातून महिलांना संधी मिळाली आहे, तर प्रभाग ४ आणि प्रभाग ८ हे नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला आरक्षित राहिला आहे.
या आरक्षणामुळे अनेक वर्षांपासून नगरसेवक असलेले राजू बेग यांचा पत्ता कट झाला आहे. मात्र, प्रभाग वाढल्याने त्यांना इतर ठिकाणी संधी मिळू शकते. तसेच, विद्यमान नगरसेविका दिपाली सावंत आणि भारती मोरे यांनाही आरक्षणाचा फटका बसला आहे. मात्र, प्रभाग रचना बदलल्यामुळे त्यांनाही अन्य प्रभागातून पुन्हा संधी उपलब्ध आहे. प्रभाग वाढल्याने अनेक इच्छुकांचे पत्ते यात कापले गेले असून, काही दिग्गजांना आपले प्रभाग बदलावे लागणार आहेत. यामुळे काही ठिकाणी नवीन इच्छुकांना संधी मिळणार आहे.
​ आरक्षणाची यादी पालिकेच्या सूचना फलकावर असून, १४ ऑक्टोबर दुपारी तीनपर्यंत यावर हरकती नोंदवण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सोडतीच्या तपशिलांचे बारकाईने विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. ज्या प्रभागांमध्ये आरक्षण बदलले आहे, तेथील इच्छुकांनी पर्यायी प्रभागांची चाचपणी सुरू केली आहे. या आरक्षण सोडतीला माजी नगराध्यक्ष संजू परब, राजू बेग, अनारोजीन लोबो, आनंद नेवगी, मनोज नाईक, ॲड. परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, समीर वंजारी, अजय गोंदावळे, महेंद्र सांगेलकर, ॲड. संजू शिरोडकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, ॲड. अनिल केसरकर, ॲड. राजू कासकर, प्रसाद अरविंदेकर, अर्चित पोकळे, निशांत तोरसकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते.
----------------
प्रभागनिहाय आरक्षण असे
प्रभाग १ ः अ-ओबीसी महिला, ब-खुला
प्रभाग २ ः अ-ओबीसी महिला, ब-खुला
प्रभाग ३ ः अ-सर्वसाधारण महिला, ब-खुला
प्रभाग ४ ः अ-सर्वसाधारण महिला, ब-ओबीसी खुला
प्रभाग ५ ः अ-सर्वसाधारण महिला, ब-खुला
प्रभाग ६ ः अ-सर्वसाधारण महिला, ब-खुला
प्रभाग ७ ः अ-सर्वसाधारण महिला, ब-खुला
प्रभाग ८ ः अ-सर्वसाधारण महिला, ब- ओबीसी खुला
प्रभाग ९ ः अ-ओबीसी महिला, ब-सर्वसाधारण खुला
प्रभाग १० ः अ-सर्वसाधारण महिला, ब-अनुसूचित जाती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com