चिपळूण-तांत्रिक कामगारांवर कोयना प्रकल्पाची जबाबदारी

चिपळूण-तांत्रिक कामगारांवर कोयना प्रकल्पाची जबाबदारी

Published on

संप काळात तांत्रिक कामगारांवर कोयना प्रकल्पाची जबाबदारी
कामगार युनियनचे उपाध्यक्ष संतोष घाडगे : वीज निर्मितीवर होऊ देणार नाही परिणाम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या प्रक्रियेच्या निषेधार्थ वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि ४२ हजार कंत्राटी कामगार ९ ऑक्टोबरला एकदिवसीय संपावर जाणार आहेत. यामध्ये पोफळी महानिर्मिती केंद्रातील ५५० पैकी ४२५ अधिकारी व कामगार संपात सहभागी होणार आहेत; मात्र आठ अभियंते आणि १२५ तांत्रिक कामगार संपात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे कोयना प्रकल्पाच्या वीजनिर्मितीवर संपाचा कुठेही परिणाम होणार नाही, अशी माहिती विद्युतक्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपाध्यक्ष संतोष घाडगे यांनी दिली.
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये विविध पद्धतीने खासगीकरणाची अंमलबजावणी सुरू असल्याचा आरोप उद्याच्या संपासाठी तिन्ही कंपन्यांतील अधिकारी व कामगारांची कृती समिती स्थापन केली आहे. महावितरणच्या नफ्याच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांना समांतर वीज वितरणाचे परवाने देणे, ३२९ उपकेंद्रांचे कंत्राटीकरण, महापारेषणमधील २०० कोटींपेक्षा अधिकच्या प्रकल्पांचे खासगीकरण तसेच महापारेषण कंपनीचा आयपीओद्वारे शेअर बाजारात समावेश करण्याचा प्रस्ताव याला समितीचा तीव्र विरोध आहे.
महानिर्मिती कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पांचे खासगीकरण आणि वीज कर्मचाऱ्यांना मंजूर झालेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी देखील हा संप पुकारण्यात आला. २०२३ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही, तसेच त्यांच्या आर्थिक बळकटीसाठी ५० हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य राज्य सरकारकडून दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर कृती समितीने संप स्थगित केला होता; मात्र त्यानंतर प्रशासनाकडून खासगीकरणाच्या हालचाली सुरूच राहिल्या असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय संप करून सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे. मध्यरात्री १२ वाजल्‍यापासून संपाला सुरुवात होणार आहे; परंतु कोयना प्रकल्पातील कामगारांची रात्रीची शिफ्ट ९ वाजता सुरू होते. त्यामुळे संप झाला तर नऊच्या शिफ्टसाठी कामगार येणार नाहीत. जे कार्यरत असतील ते नऊनंतर प्रकल्पातून बाहेर येतील. त्यानंतर विद्युतक्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे पदाधिकारी कोयना प्रकल्पाच्या वीज निर्मितीवर लक्ष ठेवतील.

कोट
तिन्ही कंपन्यांमधील पुनर्रचना व्हावी, अशी आमची मागणी होती. निर्मिती आणि पारेषणमधील पुनर्रचना झाली आहे. महावितरणमधील व्हायची आहे. त्याला महावितरणच्या कामगारांचा विरोध आहे. आमची संघटना या संपात सहभागी होणार नाही. तसेच प्रकल्प बंद पडणार नाही.
- संतोष घाडगे, उपाध्यक्ष, विद्युतक्षेत्र तांत्रिक कामगार युनियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com