दोडामार्गात उद्या ''हिंदू एकता रॅली''

दोडामार्गात उद्या ''हिंदू एकता रॅली''

Published on

swt92.jpg
97529
दोडामार्गः पत्रकार परिषदेत हिंदू एकता रॅलीची माहिती देताना श्रीगणेश गावडे व विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी. (छायाचित्रः संदेश देसाई)

दोडामार्गात उद्या ‘हिंदू एकता रॅली’
श्रीगणेश गावडेः विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ९ : हिंदू धर्मावर होणारे आघात आणि दोडामार्ग तालुक्यातून होत असलेल्या गोमांस तस्करीच्या निषेधार्थ सर्व हिंदू संघटना, संप्रदाय, मंदिर समित्या, कला-क्रीडा, सांस्कृतिक मंडळे, युवाशक्ती, मातृशक्ती व हिंदू रक्षा महासमितीच्या वतीने दोडामार्ग येथे शनिवारी (ता. ११) सायंकाळी ३ वाजता हिंदू एकता रॅली आयोजित केली आहे. या रॅलीला जिल्ह्यातील तमाम हिंदूंनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.
याबाबत हिंदू रक्षा महासमितीच्या वतीने श्रीगणेश गावडे यांनी निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन रॅलीबाबत माहिती दिली. गावडे म्हणाले की, देशात जर काही चुकीचे घडत असेल आणि त्याबाबतची पोलिसांना सूचना देऊन सुद्धा थांबत नसेल तर, यापुढे रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी हिंदू बांधवांची राहील. हिंदू रक्षा समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे यांना भेटून हिंदू धर्माविरोधात चाललेल्या सर्व प्रकरणांची यादी त्यांच्याकडे सादर करणार आहोत. हिंदू एकता रॅलीमध्ये हिंदू धर्माशी निगडीत असलेल्या सर्व संघटना, सामाजिक संस्था, संप्रदाय, मंदिर समित्या, कला-क्रीडा सांस्कृतिक मंडळे, युवाशक्ती, मातृशक्ती आदी सर्व हिंदू बांधवांनी या रॅलीत सहभागी होऊन हिंदू एकतेची ताकद दाखवावी. ही रॅली राष्ट्रोळी मंदिर सावंतवाडा ते दोडामार्ग मुख्य चौक अशी काढली जाणार आहे.
यावेळी ''भारत माता की जय'' संघ गोवा व महाराष्ट्र राज्य कार्यवाहक श्रीगणेश गावडे, जीवन विद्यामिशन व ज्येष्ठ नागरिक संघटन तालुकाध्यक राजाराम सावंत, हिंदू रक्षा समिती तालुकाध्यक्ष तथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष प्रकाश गवस, विश्वहिंदू परिषद संयोजक मनोज वझे, श्री दत्त पद्मनाभ पीठ कार्यकर्ते महेश शेटकर, मातृशक्ती संघटना गोवा व महाराष्ट्र राज्याध्यक्ष शुभांगी गावडे, राष्ट्रीय मातृशक्ती तालुकाध्यक्ष विनिता देसाई, माझी आई संघटना सदस्य मोहिनी रेडकर, सनातन संस्था प्रसिद्धी प्रमुख सुनील नांगरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, बजरंग दल तालुका संयोजक नीळकंठ फाटक, विश्‍व हिंदु परिषद दोडामार्ग प्रखर मंत्री नीलेश साळगावकर, नाणिज ज्ञानपीठ कार्यकर्ते सुभाष गवस, काडसिध्देश्वर सांप्रदाय सदस्य राजेश धर्णे, ‘भारत माता की जय’ सहकार्यवाहक मयूर दळवी आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com