टपाल खाते

टपाल खाते

Published on

-rat९p१२.jpg-
P२५N९७५३७
रत्नागिरी : पत्रकार परिषदेत माहिती देताना डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले.
-----------
रजिस्टर, स्पीड पोस्टसेवेचे एकत्रीकरण
अधीक्षक सरंगले ः परदेशांत फराळ पाठवण्यास सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : भारतीय डाकसेवा ही जनसेवा हे ब्रीद घेऊन १७१ वर्षे कार्यरत आहे. बदलत्या युगात आता टपालखात्याने रजिस्टर सेवा व स्पीड पोस्टसेवेचे एकत्रीकरण केले आहे. त्यामुळे ही सेवा न्यायिक पत्रे, वकील, व्यावसायिक यांच्यासाठी सोयीची ठरणार आहे तसेच परदेशांत आपल्या कुटुंबीयांनी दिवाळी फराळ पाठवण्यासही रत्नागिरीतून सुरुवात झाली आहे, अशी माहिती डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डाकघर अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला सहाय्यक डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, गजानन करमरकर उपस्थित होते. सरंगले यांनी सांगितले की, आजच्या युगात ५० पैसेएवढ्या अल्पदरात डाकसेवा दिली जात आहे. डाकविभाग त्यामागे जवळपास २० रुपयांचा तोटा सहन करत आहे; परंतु डाक ही जनसेवा असल्याने ही सेवा दिली जात राहील. १ ऑक्टोबरपासून रजिस्टर सेवा व स्पीड पोस्टसेवेचे एकत्रीकरण झाले आहे. गेल्याच महिन्यात जिल्ह्यातील सर्व सरपंचांना पत्र पाठवून टपालखात्याच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल.
अनेक संस्था, वकील यांना स्पीडपोस्टची आवश्यकता भासते. अॅड्रेसी स्पेसिफिक या सेवेसाठी न्यायिक पत्रे, वकिलांची पत्रे पाठवण्यासाठी नवीन दर लागू झाला आहे. यानुसार ५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटासाठी स्थानिक १९ रुपये ते कमाल ४७ रुपये, ५१ ते २५० ग्रॅमसाठी स्थानिक २४ व कमाल ७७ रुपये आणि २५१ ते ५०० ग्रॅमसाठी स्थानिक २८ व कमाल ९३ रुपये भरावे लागतील. अॅड्रेसी स्पेसिफिक रजिस्ट्रेशनसाठी ५ रुपये भरून फक्त त्याच व्यक्तीला वितरण करता येईल. पोचपावती पत्र पाठवण्यास प्राप्त होण्याची सुविधा दहा रुपये व जीएसटी भरून घेता येईल तसेच मोबाईल ओटीपी आधारावर वितरण करण्यासाठी ५ रुपये अधिक प्रभार भरावा लागेल.

चौकट १
१५ जणांनी पाठवला फराळ
दिवाळीचा फराळ युरोपमधील देशांसह अमेरिकेमध्येही पाठवता येईल. त्यासाठी फराळाच्या पदार्थांची पूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे. १५ किलोपर्यंतच्या एका पार्सलसाठी ५५०० रुपयांपासून पुढे प्रत्येक देशानुसार वेगवेगळा खर्च येणार आहे. गेल्या वर्षी २८ ग्राहकांनी असा फराळ पाठवला होता, त्यातून टपाल विभागाला १ लाख ७९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. आता साधारण १५ जणांनी फराळ पाठवला असून, पुढील चार दिवसांत ही संख्या वाढेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
----------
कोट
काळानुसार, टपाल विभागात अनेक सुधारणा होत आहेत. पूर्वी एसटीनेच टपाल विभागाची सर्व पार्सल येत होती; परंतु आता रत्नागिरीतून पहाटे टपाल विभागाचे वाहन रत्नागिरी ते मंडणगड तालुक्यापर्यंत जाऊन रात्रीपर्यंत परत येते. यामुळे टपाल वेळेतच पोहोचवण्यासाठी सुलभ होत आहे. गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या अत्याधुनिक सिस्टिममुळेही तत्पर सेवा देण्यासाठी टपाल विभाग कटिबद्ध आहे.
--ए. डी. सरंगले, डाकघर अधीक्षक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com