भाजप प्रदेशाध्यक्षांकडून जिल्ह्याचा आढावा

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून जिल्ह्याचा आढावा

Published on

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून
जिल्ह्याचा आढावा
चिपळूण ः भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि मंडळ अध्यक्ष यांची संघटनात्मक विषयावर चर्चा विनिमय करण्यासाठी मुंबईत बैठक घेतली. बैठकीला माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस नीलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, खेड दक्षिण मंडल अध्यक्ष विनोद चाळके, गुहागर मंडल अध्यक्ष अभय भाटकर, चिपळूण ग्रामीण पश्चिम मंडल अध्यक्ष उदय घाग, खेड उत्तर मंडल अध्यक्ष ऋषिकेश मोरे, मंडणगड अध्यक्ष प्रवीण कदम, दापोली शहर मंडल अध्यक्षा जया साळवी, दापोली ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन होडबे, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे आदी उपस्थित होते.

महिला प्रशिक्षण
शिबिर मुरादपूरमध्ये
चिपळूण ः भारतीय जनता पार्टीच्या सेवा पंधरवडा उपक्रमानिमित्त चिपळूण शहरामध्ये जवळपास सर्व प्रभागांमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. मुरादपूर प्रभागामध्ये भाजप ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा वैशाली निमकर यांच्या घरी प्रशिक्षण घेण्यात आले. त्या वेळी उमा म्हाडदळकर प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित होत्या. मुरादपूर भागातील महिलांनी या प्रशिक्षणामध्ये भाग घेतला. प्रशिक्षणामध्ये कागदापासून कंदील बनवणे, ज्वेलरी, कापडी पिशव्या बनवणे आदी वस्तू प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने भाजपने हे अभियान राबवले आहे. शिबिराच्या उद्‍घाटनाप्रसंगी भाजप चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी, सहकार सेल जिल्हाध्यक्ष रत्नदीप देवळेकर, शहर सरचिटणीस सारिका भावे, महिला मोर्चा शहराध्यक्षा रसिका देवळेकर आदी उपस्थित होते.

संकल्प अभियान
कार्यशाळा चिपळुणात
चिपळूण ः चिपळूण येथील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान कार्यशाळा झाली. कार्यशाळेला भाजप महाराष्ट्र प्रदेश आत्मनिर्भर भारतासह संयोजिका तथा वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मार्गदर्शन केले. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची गरज उद्भवते ती पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपल्याकडे ते उत्पादन सुरू होते ते स्वदेशी या विषयावर पंडित यांनी मार्गदर्शन केले. हर घर स्वदेशी घर घर स्वदेशी अशा प्रकारे घोषणा देण्यात आल्या. या वेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, कोकण विभाग संवादक अभिजित पेडणेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com