गंजिफा कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

गंजिफा कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

Published on

swt927.jpg
N97657
सावंतवाडी ः श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्यावतीने राजघराण्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्राध्यापक व कर्मचारी.

गंजिफा कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप
सावंतवाडी राजघरण्याचा पुढाकारः टपाल विभागाच्या पोस्ट तिकिटावर स्थान मिळाल्याने गौरव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः भारतात १६ व्या शतकात आलेली गंजिफा कला सावंतवाडी संस्थानच्या माध्यमातून आजही जोपासली गेली आहे. गंजिफा कलावंतांच्या माध्यमातून राजघराणे हा वारसा जोपासत आहेत. सावंतवाडी संस्थानाच्या गौरवशाली कला-परंपरेचा देशभरात पुन्हा एकदा सन्मान झाला. ‘गंजिफा’ कला आणि त्यातील दशावतारांना भारतीय टपाल विभागाने विशेष पोस्ट तिकिटावर स्थान दिले आहे. यानिमित्ताने राजघराण्याकडून गंजिफा कलावंतांचा सन्मान करण्यात आला. तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्यावतीने राजघराण्याचे अभिनंदन करण्यात आले.
देशाच्या इतिहासात प्रथमच चौकोनी नसून गोलाकार स्वरूपातील पोस्ट कार्ड या निमित्ताने प्रसिद्ध केले आहे. मुंबई येथे हा सोहळा पार पडला. यानंतर सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांच्या उपस्थितीत सावंतवाडी राजवाडा येथील गंजिफा कलावंतांचे कौतुक करत सन्मान करण्यात आला. या कलावंतांमध्ये मोहन कुलकर्णी, सदाशिव धुरी, पांडुरंग धुरी, रामचंद्र ठाकूर, वर्षा लोंढे, विश्वनाथ कुलकर्णी, लाडू ठाकूर, गायत्री कुलकर्णी, सुकन्या पवार, गौरी पारकर, आर्या देवरूखकर, सोनाली कुंभार, यश धुरी, भुवन हळसकर, निकिता आराबेकर, सचिन कुलकर्णी या कलावंतांचे कौतुक करण्यात आले.
दरम्यान, या यशासाठी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्यावतीने राजघराण्याचे अभिनंदन करण्यात आले. या गौरवामुळे सावंतवाडीची कला-संस्कृती आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याचे उद्गार प्राध्यापकांनी काढले. यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संस्थेचे डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, प्रा. जी. एम. शिरोडकर, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल उपस्थित होते.

चौकट
गंजिफा कलावंतांना राजाश्रय मिळावा
यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी, राजेसाहेब शिवरामराजे भोसले, राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्यामुळे आज हा गंजिफा पोस्ट कार्डच्या माध्यमातून सावंतवाडीची कला देशोदेशी पोहोचणार आहे. ही सावंतवाडीसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे सांगितले. तसेच गंजिफा कलावंतांना शासनाने राजाश्रय द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

कोट
पोस्टकार्डवर दशावतार गंजिफा कलेचे सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे. कृष्णाचे दहा अवतार यातून बघायला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती, परंपरा देखील समजणार आहे. या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या समृद्ध लोककलांना एक मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे.
- युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले

कोट
सावंतवाडीच्या कला-संस्कृतीचा, परंपरेचा आणि माझ्यासारख्या कलाकारांच्या मेहनतीचा हा गौरव आहे. हा मोठा सन्मान असून आज खूप आनंद झाला आहे.
- मोहन कुलकर्णी, ज्येष्ठ गंजिफा कलावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com