पालिका नव्या इमारतीली हवेत 30 कोटी

पालिका नव्या इमारतीली हवेत 30 कोटी

Published on

चिपळूण पालिकेच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव
शासनाकडून ३० कोटींचा निधी अपेक्षित; शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः चिपळूण नगरपालिका डिसेंबर महिन्यात १५० वर्षे पूर्ण करत असून, या ऐतिहासिक टप्प्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची सुसज्ज नवी इमारत उभारण्यासाठी तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या निधीला अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळेल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.
नगरपालिकेत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार निकम म्हणाले, नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त बहादूर शेखनाका ते चिंचनाका या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण होणे अत्यावश्यक आहे. या कामासाठी प्रयत्न सुरू असून, शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी जनसंवाद यात्रेच्यानिमित्ताने चिपळूणला येत असून, त्यांची जनसभा होणार नसली तरी ते सर्वसामान्य नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. शहरातील रखडलेले प्रकल्प तसेच आवश्यक असणाऱ्या विकास कामांबाबत आपण उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मुद्दे मांडणार आहोत. शंकरवाडी येथे बांधण्यात आलेल्या नलावडा बंधाऱ्यामुळे शहरात पुराचे पाणी शिरण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. मोडक समितीचा अहवालही आता मान्य झाल्याने पूरमुक्तीसाठी विविध उपाययोजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. पाटबंधारे विभागाकडे २३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यालाही मंजुरी मिळेल असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला.
पवन तलाव मैदानाचे सुशोभीकरण सुरू असून, त्या परिसरातील इमारतींचे पुनर्विकास आणि कुटुंबांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ग्रॅव्हिटी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व योजना पुढे नेण्याचा आपला निर्धार असल्याचे निकम यांनी सांगितले.
---
मैदानेही विकसित होणार
पेठमाप–मुरादपूर पुलासाठी एकूण १८ कोटी रुपयांचा निधी, सामाजिक सभागृहांसह शहरातील विविध मैदानांचे आधुनिकीकरण सुरू असून गोवळकोट, पवन तलाव, उक्ताड ही तिन्ही मैदाने नव्याने विकसित केली जात असल्याचे आमदार शेखर निकम यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com