किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये
युवराज गांवकरला ‘सुवर्ण’

किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये युवराज गांवकरला ‘सुवर्ण’

Published on

97700
युवराज गांवकर

किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये
युवराज गांवकरला ‘सुवर्ण’
कनेडी,ता. १० ः माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचा विद्यार्थी युवराज शिवाजी गांवकर याने जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गतर्फे सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत युवराज गांवकर याने १९ वर्षाखालील ५० किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी केली. युवराज गेल्या अनेक वर्षापासून किक बॉक्सिंग चा सराव करत असून प्रशालेचे पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक बयाजी बुराण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून या त्याच्या सुवर्णमय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, शालेय समिती चेअरमन आर.एच.सावंत, मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी आदींनी त्याला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com