स्थानिक एसआयएलसी
गृहनिर्माण संस्था (सोसायटी) मॅनेजर कार्यशाळा
रविवारी सांगली येथे आयोजन
सांगली, ता. १० : गृहनिर्माण संस्था या शहरी भागात प्रमुख निवासी व्यवस्था आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांना (विशेषतः सहकारी) व्यवस्थापकांची गरज असते जे त्यांचे दैनंदिन व्यवहार पाहू शकतात आणि त्यांचे खाते (अकाउंट) सांभाळू शकतात. सध्या मागणी असणाऱ्या या करिअर संधीविषयी माहिती देणारी एक दिवसीय कार्यशाळा रविवारी (ता. १२ ऑक्टोबर) आयोजिली आहे. कार्यशाळेत सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, सोसायटीच्या प्राथमिक नोंदी तयार करणे, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, वार्षिक सर्वसाधारण सभेचा अजेंडा आणि कार्यवृत्त लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतरण, देखभाल बिले तयार करणे, बँक व कॅश व्हाउचर तयार करणे, विक्रेत्यांचा चेक तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे, सॉफ्टवेअर प्रशिक्षण, चॅट जीपीटी तसेच इतर एआय साधनांचा वापर आदी विषयांचा समावेश आहे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ९८८१३७८१०२, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२
क्यूआर कोड
ठिकाण : सकाळ कार्यालय, शिव पॅव्हेलियन, राम मंदिर चौक, सांगली