-बाणकोटमधील न्यायालयाचे ब्रिटीश वारसत्व

-बाणकोटमधील न्यायालयाचे ब्रिटीश वारसत्व

Published on

-rat११p५.jpg -
२५N९७९१२
बाणकोट : ब्रिटिशकाळात न्यायालय सुरू असलेली ही जागा.
----------

बाणकोटमधील न्यायालयाचे ब्रिटिश वारसत्व
इतिहास देतंय साक्ष; पहिले व्यापारीबंदर ते सर्किट बेंचपर्यंतचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ११ ः ब्रिटिश कालखंडातील न्यायव्यवस्थेचे साक्षीदार ठरलेले बाणकोट आजही त्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा जपून आहे. कधी पोर्तुगीजांचे पहिले व्यापारी बंदर तर कधी ब्रिटिश सत्तेखालील सर्किट बेंचचे ठिकाण ठरलेले हे ऐतिहासिक गाव बाणकोट न्यायव्यवस्थेच्या प्रवासात एक महत्त्वाचा अध्याय आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील या टोकाच्या गावात आजही ब्रिटिशकाळातील न्यायालयाची भग्न वास्तू आणि आर्थर मिलेट यांचे स्मारक, या काळाची साक्ष म्हणून उभे आहेत. बाणकोट बंदरातूनच पोर्तुगीज पुढे गोव्यात स्थायिक झाले. ब्रिटिशांकडे हे बंदर हस्तांतरित झाल्यानंतर बाणकोटचा समावेश त्या काळच्या बॉम्बे प्रोव्हिसमध्ये म्हणजे आजच्या मुंबई प्रांताच्या कार्यक्षेत्रात झाला. त्या काळात मंडणगडपेक्षा बाणकोटचे व्यापारी व प्रशासकीय महत्त्व अधिक होते. ब्रिटिशकाळात बाणकोट येथे काही काळ सर्किटबेंचचे काम चालत असे. याच ऐतिहासिक धाग्यावर आधारित राहून २०१८ मध्ये रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने आपल्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बाणकोट येथे विशेष कार्यक्रम घेतला. त्या वेळी ब्रिटिशकाळात न्यायालयाचे कामकाज चालत असलेल्या वास्तूचा शोध घेऊन तिथेच हा कार्यक्रम झाला. इतिहास सांगतो की, १८६७ ला रत्नागिरी येथे जिल्हा न्यायालयाची स्थापना झाली. त्यामुळे २०१८ ला १५० वर्षपूर्तीचा सोहळा साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन भारतात परतलेल्याला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ३ एप्रिल २०२३ रोजी त्यांच्या मूळ गावी आंबडवे येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गावी मंडणगड येथे न्यायालय सुरू करण्याची मागणी मांडण्यात आली. सततच्या पाठपुराव्यानंतर शासनाने मंडणगड न्यायालयास मंजुरी दिली. सात नियमित व तीन सेवाबाह्य पदांसह ७१ लाख ७६ हजार ३४० इतका खर्च मंजूर करण्यात आला.
-----
चौकट
आजही इमारतीचे भग्न अवशेष
आजही बाणकोटमध्ये ब्रिटिशकाळातील न्यायालयाच्या इमारतीचे भग्न अवशेष पाहायला मिळतात याशिवाय बाणकोटजवळील किल्ले हिंमतगड परिसरातील ‘आर्थर मिलेट ग्रेव्ह’ हे स्मारक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या वास्तव्याचे पुरावे अधोरेखित करते आणि या गावाच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाला अधिक अधोरेखित करते.
---------
कोट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावी न्यायालयाची स्थापना होणे, ही त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे. या न्यायालयातून गोरगरीब जनतेला डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित असा न्याय मिळेल.
- ॲड. विलास पाटणे, अध्यक्ष रत्नागिरी बार असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com