विद्यार्थ्यांच्यात मुल्यांची जोपासना आवश्यक
‘विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची
जोपासना आवश्यक’
पाली ः शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये विविध चांगल्या मूल्यांची जोपासना होऊन ती चांगल्या प्रकारे वृद्धिंगत व्हावी यासाठी शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन तालुका प्रकल्प समन्वयक सुकन्या ओळकर यांनी केले. महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे प्रशिक्षण पाली विद्यामंदिरामध्ये झाले. तीन दिवसांच्या प्रशिक्षणात केंद्र संचालक केंद्रप्रमुख विष्णू पवार, मार्गदर्शक शिक्षक मनोजकुमार खानविलकर, मधुरा खानविलकर, स्मिता सावंत, मेघा जोशी, क्रांती लोहार यांनी मार्गदर्शन केले. या बिटातील ४५ शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, उपशिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ, मारुती घोरपडे, श्रुती वारंग, प्रमिला मावळणकर यांनी केले होते.
नाणीजला अनुगामी
लोकराज्य महाअभियान
पाली ः रत्नागिरी तालुक्यातील नाणीज माध्यमिक विद्यामंदिरामध्ये अनुलोम आयोजित अनुगामी लोकराज्य महाअभियान यावर व्याख्यानपर कार्यक्रम झाला. या वेळी प्राचार्या रूपाली सावंतदेसाई, अनुलोम संस्थेचे भाग-जनसेवक ओंकार पिंपुटकर, प्रमुखवक्ते निखिल आपटे आदी उपस्थित होते. आपटे यांनी भारतीय स्वातंत्र्य, संविधान समिती, संविधान निर्मिती प्रक्रिया, लोकशाहीचे महत्व, संविधानात समाविष्ट बाबी, संविधानातील कलमे व परिशिष्ट, झालेल्या घटना दुरुस्ती, नागरिकांचे हक्क आदींबाबत माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.