वसुंधरा पायी दिंडीद्वारे निसर्ग वाचवण्याचे आवाहन

वसुंधरा पायी दिंडीद्वारे निसर्ग वाचवण्याचे आवाहन

Published on

rat12p22.jpg-
98110
गोवाः रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून गोव्यातून निघालेली पायी दिंडी.
---------
वसुंधरा पायी दिंडीद्वारे निसर्ग वाचवण्याचे आवाहन
जगद्गुरू नरेंद्रचार्य उपपिठ ; गोवा येथून दिंडी रवाना, ठिकठिकाणी वृक्ष लागवड
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ११ : रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या सात उपपिठांवरून निसर्ग वाचवण्याचे आवाहन करीत ‘वसुंधरा’ पायी दिंड्या वाटचाल करीत आहेत. गोवा येथील उपपिठावरून १० ऑक्टोबरला सहाशेवर भाविक या दिंडीद्वारे रवाना झाले आहेत.
शुक्रवारी (ता. १०) सकाळपासूनच भाविक दिंडीत सामील होण्यासाठी ओल्ड गोवा येथील उपपिठावर जमले होते. वसुंधरा रक्षणाचे संदेश मुद्रीत केलेली एकसारखी वेशभूषा करत हातात पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक घेऊन भाविक दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ओल्ड गोवा येथील आमदार राजेश फळदेसाई उपस्थित होते. त्यांनी दिंडीतील वृक्ष लागवड उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी निखिल देसाई, सुदिन तेंडुलकर, प्रवीण ठाकूर उपस्थित होते. आमदार राजेश फळदेसाई, सचिन देसाई यांच्यातर्फे रोपांचे वाटप करण्यात आले. दिंडी मार्गात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या निवास स्थानाजवळ वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा, ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर युवावर्गाने पथनाट्य सादर करून जनजागृती केली. या दिंडीद्वारे वाटेत ठिकठिकाणी झाडे लावली जाणार आहेत. वाटेत गावोगावी ते ‘ग्लोबल वॉर्मिग’बाबत लोकांमध्ये जागृती करीत आहेत. सर्व दिंड्या २१ ऑक्टोबरला रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या जन्मोत्सवादिनी नाणीजधाममध्ये दाखल होतील. गोवा येथील दिंडी २५० किमीचे अंतर पार करून नरेंद्रचार्य यांच्या जन्मदिनी नाणीज येथे पोहोचणार आहे.

चौकट
दिंडीद्वारे जनजागरण
सध्या वातावरणात अमुलाग्र बदल होत आहेत. वेळीअवेळी पाऊस पडणे, प्रचंड उष्णतामान वाढणे, जमिनी निकृष्ट दर्जाच्या होणे, असे दुष्परिणाम जाणवत आहेत. ते थांबवण्यासाठी रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून पायी दिंड्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देणे, पाण्याचे महत्व सांगणे, प्लास्टिक वापर टाळून निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तूंचा वापर टाळणे, याबाबत जनजागरण केले जात आहे. दिंडीतील भाविकांच्या हातात प्रबोध करणारे प्रचार फलक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com