पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्ण तयार

पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्ण तयार

Published on

rat12p26.jpg-
98122
चिपळूण : राष्ट्रवादीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना शेखर निकम.
--------------------
पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्ण तयार
चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेस ; पार्लमेंटरी बोर्डाद्वारे उमेदवार निवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ः महायुतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यावा, मात्र युती झाली नाही तर पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्ण तयार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण येथे झालेल्या बैठकीत आमदार शेखर निकम यांच्यापुढे सांगितले.
चिपळूण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत आमदार निकम म्हणाले, इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाकडे मागवले जातील. त्यासाठी एक पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करण्यात येणार असून, या बोर्डाचे प्रमुख प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम असतील. पालिकेतील विकासकामांचा विचार केला, तर पालिका आपल्या ताब्यात घेण्यात पक्षाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पक्षातील कार्यकर्त्यांनी उत्साहाने काम करत नागरिकांशी थेट संवाद साधावा. बॅनर लावून पक्ष मोठा होत नाही, घराघरांत संपर्क साधल्यानेच जनतेचा विश्वास जिंकता येतो. बैठकीत प्रांतिक सरचिटणीस जयद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी उपस्थित होते.

चौकट
पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा
कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून निवडणुकीत पेटून उठावे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता पक्षाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी व्यक्त केला. तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. सर्वांनी एकजुटीने आणि झटून काम केल्यास पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे शक्य असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com