विजयदुर्गमध्ये घरोघरी ‘आयुष्मान’ मोहीम

विजयदुर्गमध्ये घरोघरी ‘आयुष्मान’ मोहीम

Published on

98280

विजयदुर्गमध्ये घरोघरी ‘आयुष्मान’ मोहीम

पंचायतराज अभियान; वयवंदना, आभा, पांढरे रेशनकार्डसाठी नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने तालुक्यातील विजयदुर्ग येथे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत समुहाने घरोघरी जात मोहीम राबवली. यामध्ये आयुष्मान भारत कार्ड, वयवंदना योजना आणि आभा आरोग्य आयडी कार्ड, पांढरे रेशनकार्ड नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवली.
या उपक्रमात आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि स्थानिक आरोग्य सेवक यांनी घरोघरी भेट देऊन संबंधित लाभार्थ्यांची माहिती संकलित केली. यासाठीच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कार्ड तयार केली. या उपक्रमात एकूण ६६ कार्ड काढण्यात आली. यामध्ये विजयदुर्गमधील गोपाळ कृष्णवाडी-आयुष्यमान कार्ड ९, वयवंदना २, रेशनकार्ड ३ (एकूण १४), बाजारपेठ वरची-आयुष्मान कार्ड ४, वयवंदना ४ (एकूण ८), बाजारपेठ खालची-आयुष्मान कार्ड १२, वयवंदना २, रेशनकार्ड १ (एकूण १५), बौद्धवाडी-आयुष्मान कार्ड १९, वयवंदना २ (एकूण २१), विठ्ठलवाडी-आयुष्मान कार्ड ४, वयवंदना ४ (एकूण ८) अशी एकूण ६६ कार्ड काढण्यात आली. ग्रामस्थांनी या सेवेला प्रतिसाद दिला. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच गरजू कुटुंबांनी या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले.
वयवंदना योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षेचा आधार मिळणार आहे, तर आयुष्मान कार्डमुळे सुमारे ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे. तसेच आभा हेल्थ आयडीमुळे वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरुपात एकत्रित राहणार आहे. आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. विशाल पाटील, आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. रंजना खरात, आरोग्य पर्यवेक्षिका गंगुताई अडुळकर, विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अधिकारी आदित्य कदम, पर्यवेक्षक अशोक मानाजी, भुमन्ना गौतमवार, नामदेव खोरणे, रवी चौरे, आरोग्य सेविका शिल्पा मेस्त्री व स्मिता खडपे, आशा मॅगी फर्नांडिस व श्रीमती नागवेकर, मदतनीस भारती तारकर आदींनी ही मोहीम राबवली. दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी, प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com