रत्नागिरी- फाटक हायस्कूलच्या व्हॉलीबॉल संघाचा डंका
rat13p14.jpg
98290
सांगली : विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत यश मिळवून राज्यासाठी निवड झालेल्या फाटक हायस्कूल व गांगण, केळकर कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ.
-------
फाटक हायस्कूलच्या व्हॉलीबॉल संघाचा डंका
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; जिल्ह्यातून प्रथमच मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील दबदबा कायम राखत रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणारा १९ वर्षांखालील फाटक हायस्कूल व गांगण, केळकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघाने विभागीय स्पर्धेत बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धा बीड येथे होणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत विभागाचे नेतृत्व करणारा रत्नागिरी जिल्ह्याचा व फाटक हायस्कूलचा हा पहिलाच संघ आहे.
१९ वर्षांखालील विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच आष्टा (जि. सांगली) येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात झाल्या. आठ संघांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत फाटक हायस्कूलच्या मुलांच्या संघाने सातारा व सांगली मनपा संघांचा २-० सेटमध्ये पराभव केला. अतिशय रंगतदार आणि अटीतटीच्या अंतिम सामन्यात सर्व खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करत कोल्हापूर जिल्हा संघाचा २५-२१, १६-२५, १६-१४ असा पराभव केला. अचूक आक्रमण व बचावात्मक संरक्षण यांचा सुरेख संगम साधत विभागीय चषकावर रत्नागिरीचे नाव कोरले. या संघात प्रज्ज्वल काजरेकर (कर्णधार), अमेय उभारे, सार्थक सनगरे, सार्थक शिर्के, साई तळेकर, वेदांत गवाणकर, मंथन आलिम, दीप भाटकर, कविराज सावंत, आर्यन वीर हे खेळाडू सहभागी होते.
चौकट
यशस्वी घोडदौड
गत वर्षी कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. या विजयाने गत वर्षी अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करत संघ बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. २०२२-२४ ला १७ वर्षांखालील मुलांचा संघ राज्यात तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. १७ व १९ वर्षांखालील मुलांचे संघ राज्यस्तरावर गेलेली फाटक हायस्कूल ही जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने सिंधुदुर्ग, सातारा संघांचा २-० असा पराभव करत चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.