रत्नागिरी- सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे उल्लेनखीय कार्याबद्दल सत्कार

रत्नागिरी- सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे उल्लेनखीय कार्याबद्दल सत्कार

Published on

rat13p17.jpg-
98303
रत्नागिरी : सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे उल्लेनखीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आले. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त पूर्वा किनरे हिच्या वतीने सत्कार स्वीकारताना आई-वडील.
-----------
सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे
उल्लेनखीय कार्याबद्दल सत्कार
रत्नागिरी, ता. १४ : गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सारस्वत ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थी व मान्यवर व्यक्ती यांचा सत्कार सारस्वत स्नेहवर्धक मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये करण्यात आला. डॉ. किशोर सुखटणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात हा कार्यक्रम झाला.
यावेळी तपस्या बोरकर, वेदांग कुलापकर, अनिका करमरकर, आयुष सामंत, गायत्री किनरे, पार्थ बोरकर या विद्यार्थ्यांचे त्यांच्या शालेयस्तरावरील उज्ज्वल यशाबद्दल कौतुक करण्यात आले. स्वरा साखळकर हिचा तायक्वांदो स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला. मिलिंद तेंडुलकर व स्नेहा साखळकर यांचा शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. सुश्रुत तेंडुलकर यांनी असोसिएशन ऑफ कोलन ॲन्ड रेक्टल सर्जन ऑफ इंडिया या संस्थेकडून अत्यंत मानाची फेलोशिप भारतात प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदकासह मिळवली, त्याबद्दल मंडळाने सत्कार केला. पूर्वा किनरे हिचा महाराष्ट्र राज्यशासनामार्फत योगासन या खेळातील यशाबद्दल शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, पुस्तक व रोख रक्कम असे सत्काराचे स्वरूप होते.
निनाद तेंडुलकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजुरी घेतली. त्यानंतर डॉ. सुखटणकर यांनी मागील वर्षाचा जमाखर्च व पुढील वर्षीचे अंदाजपत्रक वाचून मंजुरी घेतली.

चौकट
अध्यक्षपदी योगेश सामंत
सारस्वत स्नेहवर्धक मंडळाची नवीन कार्यकारिणी घोषित झाली. यामध्ये अध्यक्षपदी योगेश सामंत, उपाध्यक्ष मिलिंद साखळकर, सचिव प्रदीप तेंडुलकर, खजिनदार मनीषा रेगे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून सचिन तेंडुलकर, रमेश साखळकर, मिलिंद तेंडुलकर, गुरुप्रसाद बोरकर, विस्मया कुलकर्णी, नरसिंह शानभाग, निनाद तेंडुलकर, सल्लागार विजय साखळकर, स्नेहा साखळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com