माजी उपनगराध्यक्ष कोरगावकरांची प्रदेशाध्यक्षांसह पालकमंत्र्यांशी चर्चा
98454
माजी उपनगराध्यक्ष कोरगावकरांची
प्रदेशाध्यक्षांसह पालकमंत्र्यांशी चर्चा
सावंतवाडी, ता. १४ ः येथील नगराध्यक्षपदाचे आरक्षण ‘सर्वसाधारण महिला’ असे जाहीर झाल्यानंतर भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांच्याकडे केली. तत्पूर्वी, पक्षाने आपल्यावर केलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे केली.
येथील नगराध्यक्ष पद ‘सर्वसाधारण महिला’ असे निघाल्याने भाजपमधून काही इच्छुकांची नावे समोर येत आहेत. माजी नगराध्यक्षा कोरगावकर यांचे नावही यात चर्चेत आले आहे. सौ. कोरगावकर या मूळ भाजपच्याच असल्याने त्यांना या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी खुद्द मुंबई येथे जाऊन याबाबत श्री. चव्हाण, पालकमंत्री राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष सावंत यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली. याबाबत पक्षाकडून निश्चितच विचार केला जाईल. आपल्यावरील निलंबन मागे घेतले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.