कळबंस्तेतील बोटॅनिकल गार्डनमध्ये १५५ दुर्मीळ फुलझाडे
rat14p16.jpg-
98473
चिपळूणः कळंबस्ते येथील देवराईत वृक्षारोपण करताना कोकण विभागीय आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी.
कळबंस्तेतील बोटॅनिकल गार्डनमध्ये १५५ दुर्मिळ फुलझाडे
कोकण आयुक्तांकडून दखल; विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता फलदायी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ः तालुक्यातील कळबंस्ते येथे उभारलेल्या देवराईतील बोटॅनिकल गार्डनची कोकण आयुक्तांनी दखल घेतली आहे. या देवराईला भेट देत तेथे स्वतः वृक्षारोपण केले आहे. या गार्डनमध्ये दुर्मिळ फुलांच्या १५५ प्रजाती असल्याने ही बोटॅनिकल लॅब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आदर्शवादी ठरेल, असा विश्वास कोकण विभागीय आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
जिल्हा दौऱ्यावर आलेले कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी व नवनिर्वाचित जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी तालुक्यातील कळबंस्ते येथे उभारलेल्या देवराईची पाहणी करत तेथे वृक्षारोपण केले. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रांताधिकारी लिगाडे यांनी पुढाकार घेत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता लोकसहभागातून पडीक शासकीय जागेत देवराई उभारली आहे. या देवराईत महसूल, कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून श्रमदान केले जात आहे. कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी देवराईच्या उभारणीचे कौतुक केले. दुर्मिळ होणाऱ्या १५५ प्रकारच्या फुलांचे येथे बोटॅनिकल गार्डन विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता फलदायी ठरणार आहे. येथील फुलांची व विविध जातींच्या रोपांची माहिती मिळण्यासाठी झाडांना क्युआरकोड लावण्यात येणार आहेत. कोकणातील देवरायांचे कालानुरूप अस्तित्व कमी होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी व दुर्मिळ होत चाललेली वृक्षसंपदा आणि देवरायांचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्याकरिता सर्व पर्यावरण व निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन कळंबस्ते येथे साडेतीन एकर जागेत देवराईची संकल्पना हाती घेण्यात आली.
चौकट
गार्डन चार महिन्यांतच नागरिकांसाठी खुले
प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेतल्यानंतर नाम फाउंडेशन, वनविभाग, काही कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देवराई उभी करण्यासाठी पुढे आल्या. येथे एकाच दिवशी १९ विविध प्रजातींची १ हजार २५२ झाडे लावली आहेत. पाण्यासाठी ठिंबक सिंचनची व्यवस्था केली आहे. झाडांना नियमित पाणी मिळण्यासाठी बोअरवेलचीही व्यवस्था आहे. फुलांचे बोटॅनिकल गार्डन येत्या तीन-चार महिन्यात नागरिकांसाठी खुले होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.