संगमेश्वर-शिववैभव पथसंस्थेला राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार

संगमेश्वर-शिववैभव पथसंस्थेला राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार

Published on

rat१४p१३.jpg-
९८४७०
पुणेः दीपस्तंभ पुरस्कार स्वीकारताना शिववैभव पतसंस्थेचे सचिव संतोष थेराडे, संचालक संजय कानल, रवींद्र थेराडे, संकेत थेराडे, कौस्तुभ मयेकर, सिद्धार्थ लाड, बालकृष्ण काष्टे आदी.

शिववैभव पथसंस्थेला
दीपस्तंभ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ः आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कुचांबे या संस्थेला कोकण विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
या संस्थेने २०२४-२५ आर्थिक वर्षात ८५ कोटीच्या ठेवी जमवल्या असून, ६५ कोटी रुपये कर्ज वितरित केले आहे. वसूल भागभांडवल ४ कोटी रुपये असून, नफा १ कोटी व एकूण व्यवसाय १५२ कोटी आहे. शासनाच्या सहकार विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेने सीडी रेशो ६९.७४ टक्के ठेवला आहे. संस्थेचा सीआरआर १.५० टक्के तसेच संस्थेचा एसएलआर २८.२४ टक्के आणि संस्थेचा सीआरएआर १३.४४ टक्के आहे.
संस्थेचे चेअरमन चार्टर्ड अकाउटंट प्रकाश थेराडे, संस्थेचे सचिव संतोष थेराडे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक आर्थिक वर्षात सर्व संचालक तसेच कर्मचारी मेहनत घेत आहेत. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे सेक्रेटरी संतोष थेराडे, संचालक संजय कानल, संस्थेचे व्यवस्थापक रवींद्र थेराडे, संकेत थेराडे, कौस्तुभ मयेकर, सिद्धार्थ लाड, संस्थेचे सल्लागार बालकृष्ण काष्टे यांनी स्वीकारला. ३० सप्टेंबर रोजी ९६ कोटी ठेवी झाल्या असून, दिवाळीपर्यंत शंभर कोटी पूर्ण करणार असल्याचे चेअरमन प्रकाश थेराडे यांनी सांगितले.

कोट
हा पुरस्कार कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाचे यश आहे. कर्मचारी व संचालक मंडळ यांच्या मेहनतीमुळे सतत ऑडिट ‘अ’ वर्ग मिळवण्यात यश आले आहे. पुरस्काराचे श्रेय हे सर्व कर्मचारी, ठेवीदार यांना जाते.
- संतोष थेराडे, सरचिटणीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com