विश्वासात घेतल्यास सहकार्य मिळेल
98450
विश्वासात घेतल्यास नक्कीच
सहकार्य ः अजित पवार गट
सावंतवाडीत निवडणूकप्रश्नी भूमिका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सन्मानजनक उमेदवार न मिळाल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी मांडली. सावंतवाडी पालिकेच्या निवडणुकीत विश्वासात घेतल्यास सहकार्य मिळेल, समन्वय न झाल्यास वेगळा पर्याय निवडावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
श्री. भोसले यांनी आज येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, यावेळी पक्षाचे नेते उमाकांत वारंग, सुरेश गवस, शफीक खान, हर्षवर्धन धारणकर, अगस्तीन फर्नांडिस, एम. डी. सावंत, अस्लम खतीब, संदीप पेडणेकर, साबाजी सावंत, रिद्धी परब, धारिणी देसाई, मेघेंद्र देसाई, विलास पावसकर, विजय कदम, रोहन परब, शिवाजी जंगले आदी उपस्थित होते.
श्री. भोसले म्हणाले, ‘‘आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही निवडणुकीला सामोरे जाणार आहे; मात्र महायुती लक्षात घेता जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपालिका निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी उमेदवार उभे करताना तो सन्मानजनक असावा, यासाठी राष्ट्रवादीला सुद्धा विश्वासात घेणे गरजेचे आहे. विश्वासात घेतल्यास सहकार्य मिळेल; अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीमध्ये उतरू. तशा प्रकारची तयारी सुद्धा आम्ही केली आहे.’’ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आम्ही दोन चेहऱ्यांची चाचपणी केली आहे. आमचे नेते अजित पवार असल्याने वेळप्रसंगी स्वतंत्र निवडणुकीमध्ये उतरू. सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आम्हाला विचारात न घेतल्यास गनिमी काव्याने निवडणुकीमध्ये रणनीती आखू, असे सूचक वक्तव्य यावेळी वारंग यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.