आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर

आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर

Published on

98499


आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर

अमित सामंत ः ‘राष्ट्रवादी’ची स्वबळाचीही तयारी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः येथील विधानसभा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सज्ज झाला असून सर्व निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार आहे. मित्रपक्षांचा विचार करता आघाडीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील; मात्र स्वतंत्र लढण्याची आमची तयारी असल्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी येथे स्पष्ट केले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष योगेश कुबल, सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस, शहराध्यक्ष देवा टेमकर, सुदेश तुळसकर, वजराठ उपसरपंच दीपिका राणे, युवक शहराध्यक्ष नईम मेमन, बावतीस फर्नांडिस, इफ्तिकार राजगुरू, प्रकाश म्हाडगुत, उल्हास नाईक, गौतम महाले, साईप्रसाद केरकर, आनंद तुळसकर, रजाक खान, एंजल नाईक आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीनंतर मोठा संघर्ष आम्हाला सोसावा लागला. यानंतर आज आमची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. सद्यस्थितीत निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार असून जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीतही आम्ही उमेदवार देणार आहोत. मित्रपक्षाला सोबत घेऊन आघाडी करायची की नाही, या संदर्भातील निर्णय वरिष्ठ करणार आहेत, परंतु सद्यस्थितीत आम्ही स्वतंत्र लढण्याचीही तयारी केली आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत. सावंतवाडीतून दोघांची नावे समोर आली असून त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे, तर दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातही काहीजण इच्छुक आहेत; मात्र अधिकृतरित्या त्यांनी तशी मागणी पक्षाकडे करावी. त्यानंतरच त्यांची नावे समोर आणू. नगरसेवक पदासाठीही अनेकांची नावे आमच्याकडे आली आहेत. आम्ही पूर्ण ताकतीने या निवडणुकीमध्ये उतरणार असून सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.’’
...................
पक्षांतर्गत कोणावरही कारवाई झाली नाही
विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढविल्यावरून अर्चना घारे-परब यांच्यासह काहीजणांवर राष्ट्रवादी पक्षाकडून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, याकडे लक्ष वेधले असता, पक्षाकडे तशी मागणी केली होती; परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही, असे जिल्हाध्यक्ष सामंत यांनी स्पष्ट केले. अर्चना घारे आजही राष्ट्रवादीत पक्षात असून त्या विविध बैठकांना उपस्थित राहत आहेत. लवकरच त्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com