समितीच्या दौऱ्यामुळे सत्ताधाऱ्यांत घबराट
समितीच्या दौऱ्याने सत्ताधाऱ्यांत घबराट
डॉ. परुळेकर ः उपजिल्हा रुग्णालयप्रश्नी टीका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः येथील उपजिल्हा रुग्णालयातील दुरवस्था आणि सातत्याने रुग्णांची होत असलेली ससेहोलपट यामुळे अभिनव फाउंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या संदर्भात उच्च न्यायालयाने सत्य पडताळणी समिती नेमली आहे. या समितीने नुकतीच उपजिल्हा रुग्णालयात पाहणी केली असून, गेल्या आठवड्यात शहरातील जागरूक नागरिकांनीही स्पॉट पंचनामा केला आहे. या सर्व प्रकारामुळे सत्ताधारी आणि आमदार कंपूमध्ये मोठी घबराट पसरल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
श्री. परुळेकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले की, ‘गेली पंधरा वर्षे मतदारांना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे गाजर दाखवून मतं लाटणाऱ्यांना, रात्री अपरात्री गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे जात असताना झालेल्या मृत्यूबद्दल कणव कशी येत नाही?, हा एक गंभीर प्रश्न आहे. सामान्य रुग्णांचे सातत्याने होणारे हाल आणि ससेहोलपट आमदारांना समर्थन देणाऱ्या महानुभावांना अजिबात दिसत नाही, यावरून त्यांच्या संवेदनेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. फिजिशियन डॉक्टर नाहीत, आयसीयू, ट्रॉमा केअर युनिट नाही आणि दिवसागणिक सहा रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवले जात आहे, ही वस्तुस्थिती वेगवेगळी मंत्रिपदं उपभोगलेल्या विद्यमान आमदारांवर नामुष्कीची वेळ आणणारी आहे. सावंतवाडी मतदारसंघ सोडून मुंबईत वास्तव्याला असणाऱ्या आमदारांना सामान्य जनतेबद्दल काडीचीही संवेदना नसल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. जागरूक नागरिकांनी केलेली पाहणी, सत्य पडताळणी समितीची पाहणी आणि आरोग्य प्रधान सचिवांचा दौरा यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले अशी एक वावडी उठवली होती. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. मुळात, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे वगैरे काही दिले नाहीत. हे सर्व वैद्यकीय अधिकारी ‘एमबीबीएस’ असून, त्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायची इच्छा आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या ‘पीजी नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी, अभ्यासासाठी त्यांना वेळ हवा आहे. यासाठीच त्यांनी एक महिन्याची नोटीस दिली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील मालवण, ओरोस येथील इतर चार वैद्यकीय अधिकाऱ्यांनीदेखील अशीच नोटीस दिली आहे. त्यामुळे, या अधिकाऱ्यांच्या रजेच्या नोटिसीचा आणि उपजिल्हा रुग्णालयातील पाहणी दौऱ्यांचा काडीमात्र संबंध नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.