मुलांना बालवयात वाचनाची गोडी लावा

मुलांना बालवयात वाचनाची गोडी लावा

Published on

98728

मुलांना बालवयात वाचनाची गोडी लावा

दीपक पटेकर ः दाणोलीत ‘मी वाचलेले पुस्तक’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः मुलांना बालवयात मोबाईलवर गाणी, टीव्हीवरील कार्टून दाखवून त्यात गुंतवून न ठेवता त्यांना प्राणी-पक्षी यांची चित्रे असणारी पुस्तके, अक्षर ओळख झाल्यावर वाचनीय पुस्तके देऊन पुस्तकांची गोडी लावली पाहिजे. अवांतर वाचन करून कठोर परिश्रमातून ज्ञान आत्मसात करावे लागेल. वाचनाची सवय असेल तरच चांगले लिखाण करता येईल. त्यामुळे मुलांचा बुद्ध्यांक वाढेल, असे प्रतिपादन कवी दीपक पटेकर यांनी दाणोली येथे केले.
तालुक्यातील दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचनालयातर्फे आयोजित वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ‘ग्रंथ प्रदर्शन’, ‘मी वाचलेले पुस्तक’ आणि ‘तुम्ही वाचा, मुले वाचतील’ असे अभिनव कार्यक्रम आज वाचनालयाच्या सभागृहात झाले. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर, वाचनालयाचे अध्यक्ष तथा साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे, माजी सैनिक सहदेव राऊळ, सचिव ॲड. एल. डी. सावंत, उपाध्यक्ष भास्कर परब, गिरीधर चव्हाण, माजी सरपंच संजय लाड, समीर शिंदे, डॉ. विठ्ठल सावंत, विलास जंगले आदी उपस्थित होते.
अध्यक्ष भरत गावडे यांनी ग्रंथालयातील उपक्रमांची माहिती दिली. अतिथी दीपक पटेकर यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. कवी पटेकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. प्रसिद्ध लेखक प्राणीप्रेमी, निसर्गप्रेमी अभ्यासक मारुती चितमपल्ली आणि जयंत नारळीकर यांची ही पाच हजारांची पुस्तके डॉ. बी. डी. पाटील यांच्या सहकार्याने वाचनालयास मिळाली आहेत. ‘मी वाचलेले पुस्तक’ उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरला. मारुती चितमपल्ली यांच्या ‘चैत्र पालवी’ पुस्तकाचा प्रगती परांजपे यांनी परिचय केला. ‘जंगलांचं देणं’ पुस्तकावर भरत गावडे यांनी विचार मांडले. पवन केसरकर, भूषण मुजुमदार यांनी पुस्तक परिचय केला. काव्या परांजपे या छोट्याशा मुलीनेही गोड आवाजात पुस्तकावर भाष्य केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दशक्रोशीतील शाळांमध्ये नव्याने दाखल शिक्षकांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. यावेळी मधुवंती मेस्त्री, जयश्री कोरगावकर, किरण केंगार आदी उपस्थित होते. डॉ. विठ्ठल सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com