रत्नागिरी ः मानसी कांबळे यांना ''अरुणा पुरस्कार'' प्रदान

रत्नागिरी ः मानसी कांबळे यांना ''अरुणा पुरस्कार'' प्रदान

Published on

rat15p2.jpg-
98651
रत्नागिरीः भाकर सेवा संस्थेच्या ३२व्या वर्धापनदिनात उपस्थित मान्यवर व पुरस्कार प्रदान सामाजिक कार्यकर्ते.

मानसी कांबळे यांना ''अरूणा पुरस्कार'' प्रदान
लांजा येथील भाकर सेवा संस्थेचा वर्धापन; शंभर जणांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः तालुक्यातील लांजा येथील भाकरसेवा संस्थेच्या ३२व्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा अरूणा पुरस्कार यावर्षी समाजसेविका मानसी कांबळे यांना प्रदान करण्यात आला तसेच सामाजिक काम करणाऱ्या शंभर लोकांचा भाकर मित्र पुरस्कार देऊन संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले.
लांजा येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हा माहिती व संपर्क अधिकारी प्रशांत सातपुते, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, डॉ. रत्ना जोशी, युयुत्सू आर्ते, महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंझाडे आदी उपस्थित होते. या वेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी संस्थेच्या ३२ वर्षाच्या वाटचालीचे कौतुक केले. तसेच या प्रसंगी प्रशांत सातपुते म्हणाले, समाजात असलेल्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत चर्चा केल्यावर समाजातील उच्चशिक्षित व्यक्ती या आपल्या पालकांना वृद्धाश्रमात पाठवतात; मात्र शेतकरी मुलगा त्याच्या पालकांना कधीच वृद्धाश्रमात पाठवत नाही, हे लक्षात येते. ही मोठी शोकांतिका आहे. युयुत्सू आर्ते यांनी संस्थेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्यासोबत संस्थेने नावीन्यपूर्ण अजून प्रकल्प करावेत यासाठी मार्गदर्शन केले तर संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील यांनी संस्थेचा संपूर्ण आढावा व कार्यक्रमाची प्रस्तावना केली. अश्विनी मोरे यांनी संस्थेच्या ३२ वर्षीय प्रवासाचे वर्णन केले. या कार्यक्रमाला भाकरसेवा संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील, अध्यक्ष मंगल पोवार, सचिव अश्विनी मोरे, खजिनदार प्रतीक्षा सोलीम, संचालक पवनकुमार मोरे, संचालक कमलताई लोकुरे उपस्थित होते.

चौकट
भाकर मित्र पुरस्काराने यांचा सन्मान
भाकर मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते. त्यात रिहाना जमादार, रामकृष्ण कीर, सचिन शिंदे, जमीर खलपे, कपिलानंद कांबळे, साक्षी गुरव, गौतम गमरे, सिद्धार्थ कांबळे, नीता कदम, पल्लवी परब, अविनाश जाधव, मयूर भितळे, राम चिंचाळे, ज्योती घडशी, राजू बनसोडे, रामेश्वर म्हेत्रे, प्रशांत बोरकर, श्रीदत्त गिरीसागर, वैभवकुमार शिंदे, आशादीप संस्था रत्नागिरी, अवधूत सुर्वे, तसलीम खोपेकर, ताराचंद पुजारी, संतोष पाथरे, आदेश कदम, दर्शना आग्रे, सोनिया सरतापे, पारस पोवार, श्रेयस घाटगे, श्रीधर पाटील, प्रतीक घाटगे, भालचंद्र लाड, चंद्रकांत वाडकर आदींसह धनज्योती महिला प्रभाग संघ नाचणे आणि जिव्हाळा संस्था खेडशी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com