चक्रभेदीतर्फे निराधारांना व्यवसाय प्रशिक्षण

चक्रभेदीतर्फे निराधारांना व्यवसाय प्रशिक्षण

Published on

चक्रभेदीतर्फे निराधारांना
व्यवसाय प्रशिक्षण
साखरपा ः साडवली येथील चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्थेतर्फे विधवा आणि एकल महिलांसाठी अर्थार्जन संधी म्हणून उद्योग कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. गंगाधर नगर येथील निवाराकेंद्रात हे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी एकल आणि विधवा महिलांच्या पुनर्वसनाची व त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाची गरज असल्याचे सांगितले. या वेळी महिलांना दिवाळी फराळ करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यात मूगडाळ आणि रवालाडू, चिवडा, शंकरपाळे, चकल्या आदी पदार्थ महिलांना शिकवण्यात आले. पदार्थ बनवण्याबरोबरच पॅकिंग, मार्केटिंग, ब्रॅडिंग याबाबतही त्यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता रावासाहेब चौगुले हे उपस्थित होते.
--------
कुणबी सहकारी
पतसंस्थेचा गौरव
लांजा ः येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र असलेली लांजा तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून या पतसंस्थेची ओळख आहे. स्थापनेपासून सभासदाभिमुख कारभार करणाऱ्या कुणबी विकास सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच लांजा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. संस्थेच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने केलेल्या चार गटांपैकी ५० ते १०० कोटी ठेवींच्या गटातून कुणबी विकास पतसंस्थेची पुरस्कारासाठी निवड केली होती. या कार्यक्रमात पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष विलास दरडे व संचालक नंदकुमार आंबेकर, लांजा शाखेचे शाखाधिकारी संतोष घडशी, लिपिक संदेश दिवाळे, संस्थेच्या सभासद निलांबरी परवडी व स्नेहल आंबेकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
------------
अब्दुल कलाम यांची
मेर्वी शाळेत जयंती
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक हिदायत भाटकर यांनी पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, ऐश्वर्या गुरव, विद्यार्थिनी मैत्रेयी अभ्यंकर, रचित म्हादये आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तकांचे वाचन करण्याच्या उद्देशाने शालेय ग्रंथालयातील पुस्तके मुलांना देण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांनी वाचनप्रेरणादिनानिमित्त पुस्तक वाचन केले. उपशिक्षिका संजया पावसकर यांनी आभार प्रदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com