चिपळूण-‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचा जल्लोष!

चिपळूण-‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचा जल्लोष!

Published on

वेदिका बुरटे ठरल्या होम मिनिस्टर
चिपळूण पालिकेचा उपक्रम ; प्लास्टिकमुक्त मोहिमेत महिलांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : चिपळूण नगरपालिकेच्यावतीने सह्याद्री निसर्गमित्र संस्था व चिपळूण नाटक कंपनी यांच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुक्ती अभियानात महिलांचा पुढाकार वाढावा, या उद्देशाने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा समारोप झाला. या मोहिमेत सहभागी झालेल्या महिलांमधून लकी ड्रॉ द्वारे वेदिका बुरटे या चिपळूणच्या होम मिनिस्टर ठरल्या तर वसुधा शेटे या खेळ पैठणीचा स्पर्धेत विजेत्या ठरल्या.
सर्वाधिक प्लास्टिक संकलन करणाऱ्या उमा आलेकर आणि मोहिमेत इतर महिलांना सहभागी करून घेणाऱ्या स्वप्नाली निवाते यांनाही पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मंगळवारी सायंकाळी पार पडला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. नृत्यमल्हार कथ्थक अॅकॅडमीच्या कोमल राणे यांनी सुंदर गणेशवंदना सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेवक उमेश सकपाळ, रसिका देवळेकर, सीमा चाळके, रांगोळीकार संतोष केतकर, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे आदी उपस्थित होते. ‘होम मिनिस्टर’ व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धांचे सूत्रसंचालन शाहीर खेरटकर यांनी केले.
चिपळूण पालिकेने आयोजित केलेल्या या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये वेदिका बुरटे यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या महिलांना जयंत साडी सेंटरच्यावतीने पैठणी देण्यात आली. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ६० वर्षांहून अधिक वयाच्या महिलांनीही उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यांच्या उत्साहाचे कौतुक करत त्यांना ‘वैभवशाली चिपळूण’ व ‘रत्नाक्षरे’ ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी केले.

चौकट
प्लास्टिकमुक्तीसाठीचे काम उत्तम
चिपळूण शहरामध्ये पावसाळ्यात पाणी भरले तर प्लास्टिकच्या बॉटल्स व अन्य काही वर येत नाहीत. चिपळूण नगरपालिका व सह्याद्री निसर्गमित्रचे प्लास्टिकमुक्तीसाठीचे काम उत्तम सुरू आहे, असे माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांनी कार्यक्रमावेळी सांगत होम मिनिस्टर स्पर्धेच्या संकल्पनेचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com