तेर्सेबांबर्डे-मांडकुली 
रस्ताकाम मार्गी लावू

तेर्सेबांबर्डे-मांडकुली रस्ताकाम मार्गी लावू

Published on

swt१६१३.jpg मध्ये फोटो आहे.
भोयाचे केरवडे ः आमदार नीलेश राणे यांना निवेदन देताना मांडकुली, भोयाचे केरवडे, मुळदे येथील ग्रामस्थ.

तेर्सेबांबर्डे-मांडकुलीच्या
रस्त्याचे काम मार्गी लावू

आमदार राणेंची ग्रामस्थांना ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः तेर्सेबांबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी हा रस्ता करावा, तसेच पुलासाठी आवश्यक असणारा निधी मिळावा, असे निवेदन मांडकुलीसह भोयाचे केरवडे, मुळदे येथील ग्रामस्थांनी आमदार नीलेश राणे यांना दिले. ही कामे लवकरच मार्गी लागतील, अशी ग्वाही आमदार राणे यांनी ग्रामस्थांना दिली.
निवेदनात असे म्हटले आहे की, पंचक्रोशीतील मांडकुली केरवडे, तुळसुली, मुळदे या गावांना जोडणाऱ्या तेर्सेबांबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडीदरम्यान कर्ली नदीवर मोठ्या पुलाची अनेक वर्षांपासून मागणी होत होती. शासनदरबारी केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे या मार्गावरील पूल पूर्ण होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तेर्सेबांबर्डे राष्ट्रीय महामार्ग ते कर्ली नदीपर्यंत जाणाऱ्या अंदाजे १५० मीटर लांबीच्या रस्त्याची नोंद तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतीने अद्याप लावलेली नाही. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न गहन बनला आहे. हा रस्ता आणि पुलाचे काही ठराविक असलेले काम पूर्ण झाल्यास ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न सुटेल, असे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद धोंड, प्रशांत धोंड, परशुराम नार्वेकर, अर्जुन परब, बाबाजी भोई, शैलेंद्र न्हावेलकर, मोहन भोई आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com