...अन्यथा मुख्यमंत्र्यांना वर्गणीतून भाऊबीज

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना वर्गणीतून भाऊबीज

Published on

swt172.jpg
99171
मालवण ः येथील तहसीलदार वर्षा झालटे यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना वर्गणीतून भाऊबीज
काँग्रेस शिष्टमंडळाचा इशाराः ‘लाडकी बहिण’चा लाभ दिवाळीपूर्वी द्या
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ः महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान घोषित केलेल्या लाडकी बहिण योजनेची थकीत रक्कम तातडीने लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. जर दिवाळीपूर्वी या महिलांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही, तर वर्गणी जमा करून ती रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाऊबीज म्हणून पाठवण्याचा इशारा यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी येथील तहसीलदार वर्षा झालटे यांना सादर केले आहे.
काँग्रेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना आणि इतर शासकीय योजनांद्वारे महिलांना लाभ दिला जातो. तसेच विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना देण्याची घोषणा करून बहिणींना दरमहा १५०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, निवडणूक संपताच आणि भाजप-शिंदे सेना-राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर या लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. या योजनांतर्गत महिलांना मिळणाऱ्या लाभात शासनाने त्रुटी निर्माण करून काही प्रमाणात निर्बंध आणले आहेत. ज्यामुळे अनेक गोरगरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे. योजनेची रक्कम तुटपुंजी असली तरी ग्रामीण भागातील महिलांसाठी ती तात्पुरत्या गरजेसाठी महत्त्वाची ठरते.
गेले वर्षभर ही रक्कम न मिळाल्याने तसेच ग्रामीण भागात पुरेशा इंटरनेट सुविधा नसल्याने महिलांना योजनेची माहिती वेळेत मिळत नाही. यामुळे लाभार्थी महिलांना रक्कमेची चौकशी करण्यासाठी बँका आणि तहसील कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यात त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. महिलांना होणारा त्रास आणि वाया जाणारा वेळ पाहता ही रक्कम दिवाळीपूर्वी याच आठवड्यात महिलांच्या खात्यावर जमा होणे अत्यंत गरजेचे असल्याचे काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. यावेळी ॲड. अमृता मोंडकर, रूपाली फर्नांडिस, शुभदा पाडगावकर, प्राची माणगावकर या महिला कार्यकर्त्यांसह जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, देवानंद लुडबे, पराग माणगावकर, सारा फर्नांडिस उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com