मुलींसाठी सायकल बनली शिक्षणाची साथी

मुलींसाठी सायकल बनली शिक्षणाची साथी

Published on

99275
मुलींसाठी सायकल बनली शिक्षणाची साथी

कुडाळ ‘इनरव्हील’तर्फे वाटप; ‘सक्षम बेटी, सक्षम समाज’अंतर्गत उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः इनरव्हील क्लब ऑफ कुडाळने ‘सक्षम बेटी, सक्षम समाज’ उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील १०० शाळकरी मुलींना सायकल वाटप केल्या. कुडाळ तालुक्यातील शाळांमधील मुलींना दिलेल्या सायकलीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. हा कार्यक्रम शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा येथे झाला.
क्लबच्या अध्यक्षा सौ. सानिका मदने, सचिव सौ. सई तेली, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, सचिन मदने, क्रिडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन रघुनाथ गावडे, वेताळ बांबर्डे, विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नागेंद्र परब आदी उपस्थित होते. इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ मधील सर्वांत मोठा उपक्रम म्हणून हा कार्यक्रम मानला जातो, असे चेअरमन सौ. पाटील यांनी सांगितले.
माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पाटील यांनी ग्रामीण भागातील १०० होतकरू मुलींना सायकल देणे हा क्लबचा सिग्नेचर प्रोजेक्ट ठरल्याचे सांगितले. श्री. परब यांनी संस्था व आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थांचे कौतुक केले. अध्यक्षा सौ. मदने यांनी सक्षम बेटी, सक्षम समाजअंतर्गत १०० मुलींना सायकल वितरण हा ड्रिम प्रोजेक्ट यशस्वी झाल्याचे सांगितले. शिवाजी इंग्लिश स्कूल, श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळसुली, श्री माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण, बॅ नाथ पै विद्यालय, कुडाळ, आंब्रड हायस्कूल, बाव हायस्कूल आदी शाळांतील मुलींना सायकली दिल्या. सचिन मदने यांनी सूत्रसंचालन केले. सौ. तेली यांनी आभार मानले.
---
कोट
मी घरी आईला मदत करून शाळेत येते. मात्र, चालत येण्यास उशीर होत होता. पण, आता इनरव्हील क्लबच्या सायकलमुळे वेळेत येऊ शकेन. शिवाय यापुढील शिक्षण घेण्यासही आता आत्मविश्वास वाढला आहे.
- मनस्वी मोडक, आठवीतील विद्यार्थिनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com