संगमेश्वर-परीक्षा संपताच किल्ले बनविण्यात पैसा फंडचे बालदोस्त रमले !

संगमेश्वर-परीक्षा संपताच किल्ले बनविण्यात पैसा फंडचे बालदोस्त रमले !

Published on

rat१८p३.jpg, rat१८p४.jpg-
P२५N९९३५४
संगमेश्वर -येथील पैसाफंड इंग्लिश स्कूलमधील सारे विद्यार्थी किल्ले, रांगोळी काढण्यात रमले. ( छाया : मिनार झगडे , संगमेश्वर)

किल्ले, रांगोळ्यांनी उजळला पैसाफंड स्कूलचा परिसर
नवनिर्मितीचा आनंद’ उपक्रम गाजला ; मुलांच्या कलागुणांना वाव
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १८ ः प्रथम सत्राची परीक्षा झाली की, मुलांना वेध लागतात ते दीपावलीच्या सुटीचे. सध्याचा जमाना हा तयार वस्तू घेण्याचा असल्याने मुलांना आकाशकंदील तयार करणे, किल्ल्यांची वैविध्यपूर्ण उभारणी करणे अशा जुन्या परंपरा विस्मरणात जाऊ नये यासाठी पैसाफंड इंग्लिश स्कूलने दोन दिवसाच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. परीक्षा झाल्यानंतर लगेचच दोन दिवस संगमेश्वर येथील पैसाफंड इंग्लिश स्कूलमधील सारे विद्यार्थी किल्ले, रांगोळी काढण्यात रमले. दोन दिवसात विद्यार्थ्यांनी आपल्यातील आगळावेगळा कलाविष्कार सादर करून मनमुराद आनंद लुटला.
परीक्षा झाल्यानंतर मुलांना थोडा विरंगुळा हवा याचबरोबर मुलांमधील सुप्त गुणांना वाव देत नवनिर्मितीचा आनंद देण्यासाठी संगमेश्वर येथील व्यापारी पैसाफंड संस्थेच्या पैसाफंड इंग्लिश स्कूलने यावर्षी दिवाळी सुटीपूर्वी दोन दिवस शाळेच्या परिसरातच किल्ले बनवणे, सुंदर सुंदर रांगोळ्या काढण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. पाचवीतील मुलांपासून बारावीपर्यंतची मुले या कामात अशीकाही मग्न झाली की, त्यातून विद्यार्थ्यांमधील आगळ्यावेगळ्या कलेचा आविष्कार पाहायला मिळाला. मुलांचे चिमुकले हात दगड आणण्यात, माती कालवण्यात, कागदकाम करण्यात कमालीचे व्यस्त झाले. कोणाच्या गालाला माती लागत होती तर कोणाच्या कपड्यांना; मात्र या कशाचीही तमा न करता मुलांनी आपले लक्ष केंद्रित केले होते, ते आपल्या कलाविष्कारावर! पाचवी ते बारावीच्या मुलांनी एकत्र येऊन दहा किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती तयार केल्या. किल्ल्यांची रचना कशी असते, याचा अभ्यासही यामुळे मुलांना करता आला. प्रशालेतील मुलींनी एकत्र येत ३०पेक्षा अधिक नेत्रदीपक अशा रांगोळ्या काढल्या. सुटीला जाण्यापूर्वी गेले दोन दिवस प्रशालेतील मुले अशा वेगळ्या उपक्रमात रमून त्यांनी आनंद घेतल्यामुळे पालकवर्गानेही पैसाफंडच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
---
मुलांच्या कलाविष्काराला प्राधान्य
व्यापारी पैसाफंड संस्थेने अभ्यासाबरोबरच मुलांच्या कलाविष्काराला प्राधान्य देण्यात आले. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यातील विविध संकल्पना साकारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे इतिहासाबाबतचे ज्ञान वाढावे म्हणून आम्ही दीपावलीच्या सुटीपूर्वी सलग दोन दिवस विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्राधान्य देत किल्ले, रांगोळ्या काढणे असे उपक्रम राबवले, असे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com