करंबेळे शेवरवाडी शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील आणि किल्ले

करंबेळे शेवरवाडी शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील आणि किल्ले

Published on

-rat१८p६.jpg-
२५N९९३५८
संगमेश्वर ः करंबेळे शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेले कंदील.
-rat१८p७.jpg-
२५N९९३५९
विद्यार्थ्यांनी बनवलेला किल्ला
---
विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील
करंबेळे-शेवरवाडीत उपक्रम ; साकारला पन्हाळा किल्ला
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १८ ः प्रथम सत्राची परीक्षा संपताच संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे-शेवरवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी विविध प्रकारचे रंगीबेरंगी आकाशकंदील तयार करून कल्पकतेला वाव दिला. याबरोबरच पन्हाळा या किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलागुण जोपासण्यासाठी दीपावलीनिमित्त करंबेळे-शेवरवाडी शाळेत मुख्याध्यापिका वेदिका पराडकर, शिक्षणसेविका सुप्रिया देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळात सुंदर आकाशकंदील तयार केले. पन्हाळा किल्ला साकारण्यापूर्वी उपक्रमशील शिक्षणसेविका देसाई यांनी मुलांना पन्हाळा किल्ल्याचा इतिहास, रचना समजावून सांगितली. मुलांनी हे सर्व बारकावे जाणून घेतल्यानंतर पन्हाळा किल्ला साकारण्यास सुरुवात केली. या उपक्रमात मुलांना मदत करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य नारायण खाके, महिलावर्ग तसेच अंगणवाडी सेविका संचिता गोंधळी, मदतनीस प्रीती खाके, दीक्षा खाके आदींनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com