पतसंस्थांमुळे गरीबांना तत्काळ सेवा
99533
पतसंस्थांमुळे गरीबांना तत्काळ सेवा
सुनील मरभळ ः सावंतवाडीत चर्चासत्र शिबिर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः पतसंस्था या गरीब व बेरोजगार लोकांसाठी तात्काळ आर्थिक सेवा पुरवणाऱ्या महत्त्वाच्या यंत्रणा आहेत. सचिवांनी आत्मीयतेने काम करणे, संस्थेमुळे स्वतःची ओळख आणि पत वाढविण्याची जाणीव ठेवणे, तसेच अद्ययावत ज्ञान मिळविण्यासाठी प्रशिक्षण घेत राहणे अत्यावश्यक आहे, असे मत कणकवलीतील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक सुनील मरभळ यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन, सावंतवाडी आयोजित कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्यातील पतसंस्थांसाठीचे पदाधिकारी व व्यवस्थापक चर्चासत्र शिबिर नुकतेच झाले. शिबिराचे उद्घाटन श्री. मरभळ यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, संचालक बाबुराव कविटकर, उपाध्यक्ष नंदकिशोर कोरगावकर, सचिव महेश्वर कुंभार आदी उपस्थित होते. श्री. मरभळ यांनी पतसंस्थांना ‘गरीब व बेरोजगार लोकांसाठीची महत्त्वाची व तात्काळ सेवा पुरवणारी यंत्रणा’ असे संबोधले. पतसंस्थांच्या सचिवांनी आत्मीयतेने काम करणे, संस्थेमुळे आपली ओळख व पत वाढते याची जाण ठेवणे आणि अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी प्रशिक्षणात सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी फेडरेशन हे पतसंस्थांचे हक्काचे व्यासपीठ असून सर्व संस्थांना एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पतसंस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मे २०२६ मध्ये आंबोली येथे जिल्ह्यातील पतसंस्थांचे महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेला व आव्हानांना तोंड देण्यासाठी संघटित होऊन प्रभावीपणे काम करणे, समस्यांवर विचारमंथन करणे आणि मार्गदर्शन करणे हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश असेल. त्याची पूर्वतयारी म्हणून तालुका स्तरावर संघटना बांधणी सुरू आहे. अधिवेशनात पतसंस्थांच्या वसुलीसाठी आणि सक्षमीकरणसाठी अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. फेडरेशनकडून वसुली अधिकारी नेमून प्रभावी वसुली यंत्रणा राबवली जात आहे. पतसंस्थांनी वसुलीसाठी कलम १०१ चे दाखले फेडरेशनकडे सादर करण्याचे आवाहन श्री. राऊळ यांनी केले. तसेच, शासनाने २८ ऑक्टोबरला आयोजित केलेल्या सायबर क्राईम व वसुलीसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील उत्कृष्ट प्रशिक्षण शिबिरात सर्व पतसंस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले. महेश्वर कुंभार यांनी प्रास्ताविक केले. डॉन्टस यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.