सावंतवाडी आगारातर्फे जादा एसटी बससेवा

सावंतवाडी आगारातर्फे जादा एसटी बससेवा

Published on

सावंतवाडी आगारातर्फे
जादा एसटी बससेवा
सावंतवाडी ः दिवाळी सुटीनिमित्त प्रवाशांच्या सोईसाठी सावंतवाडी एसटी आगारातर्फे पुणे- कोल्हापूर व तुळजापूर या लांब पल्ल्याच्या मार्गावर जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. १७ ऑक्टोबरपासून या मार्गावर तीन जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. बांदा ते कोल्हापूर ही सावंतवाडी बसस्थानकातून दुपारी २.४५ वाजता, सावंतवाडी कोल्हापूर मार्गे तुळजापूर सकाळी ८ वाजता तर पणजी-निगडी ही बस पणजीहून रात्री ९ वाजता सुटून ती सावंतवाडी बसस्थानकातून १०.३० वाजता सुटणार आहे. कोल्हापूर, पुणे व तुळजापूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांनी जादा बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख नीलेश गावित यांनी केले आहे. ही जादा गाड्यांची सेवा दिवाळी सुटीत २५ ऑक्टोबरपर्यंत आहे. सुटीच्या कालावधीत प्रवासी उपलब्धतेनुसार आणखीही लांब पल्ल्याच्या मार्गावर जादा गाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे. प्रवाशांनी आरक्षण बुकिंग केल्यास जादा बस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक गावित यांनी दिली.
----
मालवण येथे
निवासी शिबिर
मालवण ः येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे साने गुरुजी संस्कार पूर्णवेळ निवासी शिबिर २६ ते ३० ऑक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मार्गदर्शक म्हणून साथी बाबासाहेब नदाफ व सहकारी शिरोळ हे करणार आहेत. १३ ते २० या वयोगटातील प्रथम येणाऱ्या केवळ ४० जणांना प्रवेश मिळणार आहे. यामध्ये प्रार्थना, उत्साहवर्धक व्यायाम, एरोबिक्स, बर्ची, लेझिम, झांज, नृत्य, गाणी, व्याख्यान, संवाद, गटचर्चा, छंद वर्ग, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम हे विषय समाविष्ट असणार आहेत. नावनोंदणीसाठी वैष्णवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
वासुदेव तुळसकरची
भालाफेकसाठी निवड
वेंगुर्ले ः रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल, तुळसने भालाफेक स्पर्धेत विभागस्तरावर मजल मारली असून या स्कूलचा विद्यार्थी वासुदेव तुळसकर याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ओरोस येथे झालेल्या भालाफेक स्पर्धेत १७ वर्षांखालील गटांत वासुदेव संतोष तुळसकरचा जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक आल्याने त्याची विभाग स्तरावर निवड झाली आहे. वासुदेव तुळसकरचे कौतुक होत आहे.
................
रेडी येथे शनिवारी
दीपोत्सवाचे आयोजन
रेडी ः रेडी- म्हारतळेवाडी येथील श्री देव ब्राह्मण-बांदवा मंदिर येथे शनिवारी (ता.२५) सायंकाळी ६.३० वाजता ५ हजार पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून सायंकाळी ७ वाजता स्वरधार संगीत संच, सावंतवाडी यांचा नावीन्यपूर्ण गीतांचा सुरेल नजराणा ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com