फिटनळीचा खेळ झालाय दुर्मिळ

फिटनळीचा खेळ झालाय दुर्मिळ

Published on

- rat२०p४.jpg-
P२५N९९७०१
बांबुपासून बनवलेली फिटनळी

फिटनळीचा खेळ झालाय दुर्मिळ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २० ः दिपावलीचा सण जवळ आल्यानंतर पूर्वी बांबूपासून छोट्या आकाराची फिटनळी बनवली जायची. त्यामध्ये चिरफळ टाकून छोट्या दांडीने ते जोरात दाबले की, खणखणीत आवाज यायचा. या आवाजाचा वेध घेऊन अन्य सवंगडी धावत यायचे. दिवाळी सण जवळ आल्यानंतर फिटनळीचा खेळ हमखास ठरलेलाच असायचा. बदलत्या काळात मात्र बांबूची ही बंदूक आता दुर्मिळ झाली आहे.
फिटनळीला ठिकठिकाणी अनेक नावांनी ओळखले जाते. याचा अर्थ कोकणाप्रमाणे हा खेळ राज्याच्या विविध भागात तेवढ्याच आवडीने खेळला जायचा. प्रत्येक भागात याची नावे बदलली आहेत. मात्र खेळामागील उद्देश मात्र मन रमवणे हा एकच होता. मेपटा, चिपनळी, नपटी, गजनळी, फटुकरी, फटाकरी, फुकणी, निपटी, बिटुकली, फोकाटणी, ठासणी अशी अनेक नावे दिली गेली. चिरफळला काही ठिकाणी कटके असे म्हणतात. बालपणीचे हे खेळ आता जवळपास इतिहास जमा झाले आहेत. आधुनिक काळात आलेल्या महागड्या आणि इलेक्ट्रॉनिक खेळण्यांपुढे त्यावेळेची मामुली फिटनळी काय उठून दिसणार? कदाचित फिटनळीत सौंदर्य नव्हते, मात्र एकमेकांना साखळीतील दुव्यांप्रमाणे बांधून ठेवण्याची ताकद होती. या फिटनळीतून निघणाऱ्या आवाजाचा वेध घेण्याची नजर आणि शक्ती प्राप्त झाली होती. असे खेळ खेळताना परस्परांत संवाद घडत होता. या संवादातून नातं अधिक बहरत जात होतं.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com