मुंबईमुळे कोकणचा विकास अऩ् शोषणही

मुंबईमुळे कोकणचा विकास अऩ् शोषणही

Published on

मुंबईमुळे कोकणचा विकास अन् शोषणही
प्रा. पंकज घाटे ः नवा महाराष्ट्र घडवण्यात महत्त्वाचे योगदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः जुनी सत्ता संपून नवी परकीय ब्रिटिश सत्ता आकाराला येत असताना कोकणी माणसाने हार न मानता बदलत्या काळाशी जुळवून घेतले. कठीण परिस्थितीतही त्याने चिकाटी, जिद्द आणि आशावाद जिवंत ठेवत स्वतःमध्ये काळानुरूप आवश्यक बदल केले आणि आपल्या उत्कर्षाचा मार्ग शोधला. मुंबईच्या झपाट्याने होत असलेल्या विकासकाळात कोकण आणि मुंबई यांचे नाते अधिक घट्ट झाले. मुंबईने कोकणचा विकास साधला, पण त्याच वेळी त्याचे शोषणही केले, असा निष्कर्ष प्रा. पंकज घाटे यानी त्यांच्या पीएच.डी.साठी केलेल्या अभ्यासात काढला आहे.
वसाहतीच्या शासनकाळातील दक्षिण कोकणातील सामाजिक-राजकीय संक्रमण या विषयाचा परामर्ष घेताना मुंबईच्या उदयानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात पुण्याने उभारी घेण्याच्या आधीच्या टप्प्यात कोकणच्या समाजधुरिणांनी नवा महाराष्ट्र घडवण्यात सक्रिय योगदान दिले असे घाटे यानी दाखवून दिले आहे.
विसाव्या शतकातील स्थानिक गणेशोत्सव चळवळ, वि. दा. सावरकरांचे तसेच हिंदुसभेचे सामाजिक सुधारणांचे कार्य, शेतकरी व कामगार संघटनांची उभारणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रावबहादूर बाबासाहेब बोले आणि अप्पा पटवर्धन यांच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे कोकणातील समाजजीवनात झालेल्या बदलांचा अभ्यास करताना. समाजातील वरच्या मानल्या गेलेल्या जातींतील सुधारणावाद आणि खालच्या मानल्या गेलेल्या जातींमधील सुधारणावाद यांच्यात येथे संघर्षही झाला असे त्यानी नमूद केले आहे. वसाहतींनी शासनाला केलेले सहकार्य पुढच्या शतकात विरोधात रूपांतरित झाले. १९२१ ते १९४७ दरम्यानच्या राष्ट्रीय चळवळीत मुख्यतः काँग्रेसच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनांत दक्षिण कोकणातील जनसामान्यांचा सहभाग, सविनय कायदेभंग चळवळीतील सत्याग्रह, स्वातंत्र्यलढ्यातील स्थानिक नेत्यांची भूमिका, जातीय दंगे आणि त्यातून समाजातील बदलत्या राजकीय जाणिवांचे विश्लेषण येथे केले आहे. प्रा. घाटे यांच्या या अभ्यासातून त्यानी मिळवलेल्या पीएच.डी.बद्दल प्राचार्य डॉ मकरंद साखळकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन आणि कार्यवाह सतीश शेवडे यांनी केले.
-----
चौकट
कोकणात अनेक बदल
ब्रिटिश शासनाच्या धोरणांमुळे घडलेल्या संक्रमण प्रक्रियेत अभिजन आणि बहुजन समाजांमध्ये भिन्न प्रकारच्या सामाजिक-राजकीय जाणीवा निर्माण झाल्या. या संक्रमण प्रक्रियेला समाजातील वेगवेगळ्या घटकांनी भिन्न प्रकारे प्रतिसाद दिला. येथील सामाजिक संक्रमण एकसंध नाही. यातून दक्षिण कोकणात अनेक बदल घडून आले; ज्याच्या खुणा आजही आपल्या आसपास दिसून येतात, असे अभ्यासामधून पुढे आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com