कुडाळात राज्यस्तरीय करिअर कार्यशाळा
swt207.jpg
99751
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. स्मिता सुरवसे. बाजूला प्रा. समीर तारी व अन्य.
कुडाळात राज्यस्तरीय करिअर कार्यशाळा
२५ पासून आयोजन ः उद्योगमंत्री, आमदारांसह उद्योजकांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘करिअर कट्टा’ हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळा येत्या २५ आणि २६ ऑक्टोबरला येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते होणार आहे. यासाठी राज्यभरातून विविध विद्यापीठांतील आणि जिल्ह्यातील सुमारे ३०० प्राचार्य व जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री, आमदार यांच्यासह उद्योग क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे, अशी माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
संत राऊळ महाराज महाविद्यालयात होणाऱ्या करिअर कट्टासंदर्भातील राज्यस्तरीय कार्यशाळेविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. डॉ. स्मिता सुरवसे, प्रा. डॉ. अजित दिघे, प्रा. समीर तारी, प्रा. अजित कानशिडे उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू अजय भामरे, किरणकुमार बोंदर, प्रा. डॉ. अतुल साळुंखे, यशवंत शितोळे, प्रा. दिलीप भारमल, प्रा. स्मिता सुरवसे, प्रा. दीपा वर्मा, प्रा. बबन सिनगारे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २६) पालकमंत्री नीतेश राणे, राजन नगरे, रवींद्र पडवळ, आमदार दीपक केसरकर, रवींद्र साठे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रा. तारी यांनी दिली.