काव्यसंग्रहाचे २५ ला प्रकाशन
काव्यसंग्रहाचे २५ला
रत्नागिरीत प्रकाशन
रत्नागिरी : वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी जनसेवा ग्रंथालयातर्फे शनिवारी (ता. २५) रत्नागिरीतील कवी, गझलकार विजयानंद जोशी यांच्या ‘थोडं कळत थोडं नकळत’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन व काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील शेरेनाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते काव्य संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होणार आहे. यामध्ये कवी संजय कुळ्ये, शुभम कदम, नितीन देशमुख, अर्चना देवधर, अरुण मौर्य आणि विजयानंद जोशी सहभागी होणार आहेत. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला व काव्यसंमेलनाला साहित्यप्रेमी, काव्यरसिक, वाचक, सभासद यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.
पाटगाव येथे
रक्तदान शिबिर
संगमेश्वर ः जिल्हा रुग्णालयात रक्त साठ्याची कमतरता जाणवत असल्यामुळे जय सांबा युवा प्रतिष्ठान पाटगाव यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात २२ रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या आहेत. त्या गरजू रुग्णांना दिल्या जाणार आहेत. हे शिबिर जिल्हा परिषद केंद्र शाळा पाटगाव येथे झाले. यावेळी नेहा रवींद्र माने, सरपंच ज्योती गोपाळ, पोलिस पाटील राजाराम खेडेकर, श्री. तांबे आदींनी रोपांचे वाटप केले. यासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. सुमीत सावंत, जयश्री सिस्टर यांचे सहकार्य मिळाले.
मुंबई-गोवा एक्स्प्रेस
२२ पासून नियमित
रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस २२ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रकानुसार संपूर्ण आठवडाभर चालवली जाणार आहे. यापूर्वी पावसाळ्यात ही रेल्वे फक्त आठवड्यातील तीन दिवस धावत होती. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेन फक्त तीन दिवस धावत होती. आता शुक्रवार वगळता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशीही ही गाडी चालवली जाणार आहे. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून सकाळी ५.२५ वाजता रवाना होते आणि त्या दिवशी दुपारी १.१० वाजता मडगाव, गोवा येथे पोहोचते. तर परतीचा प्रवास मडगावहून दुपारी २.४० वाजता सुरू होतो. ती गाडी रात्री १०.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.