चिपळुणात उड्डाणपुलावर बसवले 400 गर्डर
- rat२०p९.jpg -
२५N९९७६०
चिपळूण : बहादूर शेख नाका येथे उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली आहे.
चिपळुणात उड्डाणपुलावर बसवले ४०० गर्डर
आवश्यक त्या उपाययोजना घेत रात्रीचे काम ; प्रत्येकी ४० टनाचा ; लांबी १,८४० मीटर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक वळवून ४० टनी गर्डर उड्डाणपुलावर चढवण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत ४०० गर्डर चढविण्यात आले आहेत.
चिपळूणमध्ये बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल बांधला जात आहे. या पुलाची लांबी १ हजार ८४० आणि रुंदी ४५ मीटर आहे. अनेक ठिकाणी नवीन पिलर (पिलर कॅप) उभारण्यात आले आहेत. डिसेंबर २०२६ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन सरकारकडून देण्यात आली आहे. सध्या पाऊस थांबल्याने कामाला वेग आला आहे. शहरातून जाणारा उड्डाणपूल हा गेल्या दोन वर्षांपासूनच चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वी बहादूरशेख येथे गर्डर कोसळल्याने उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जा विषयी शंका निर्माण झाली होती. त्यानंतर नवीन डिझाईन मंजूर करण्यात आले. पूर्वी दोन पिलर मध्ये ४० मीटरचे अंतर होते. नव्या डिझाईननुसार प्रत्येकी २० मीटर अंतरावर पिलर उभारण्यात आले आहेत. पाऊस थांबल्यामुळे उड्डाण पुलावर गर्डर चढवण्याच्या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत ४०० गर्डर चढवून झाले आहेत. तर अजून तेवढेच गर्डर चढवण्याचे काम प्रलंबित आहे. यासाठी १५०० टनी व १००० टनी अशा दोन क्रेन मागवण्यात आल्या आहेत.
गर्डर बसविण्याचे काम अत्यंत जोखमीचे आहे. गर्डर चढवताना अपघात झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनी सर्व प्रकारची काळजी घेऊन हे काम करत आहे. प्रामुख्याने दिवसा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सतत वाहतूक असते अशावेळी गर्डर चढवण्याच्या कामात व्यत्यय येतो त्यामुळे गर्डर चढविण्याचे काम रात्री आठ नंतर हाती घेतले जाते. रात्री महामार्गावर वाहतूक कमी असते तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी बंद केली जाते तर कधी शहरातील अन्य मार्गावर वळवली जाते. यासाठी महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस आणि एजन्सीचे कर्मचारी तैनात केले जातात.
---
चौकट
सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला तडे
मुंबई-गोवा महामार्गाची नवीन डेडलाईन वेळोवेळी देण्यात येते. २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल असे अंदाज सांगण्यात आले आहेत. पूर्ण झालेल्या महामार्गावरील खड्डे दररोज वाढत आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला तडे गेले आहेत. शहरातील महामार्गावर अपघाताचे ब्लॅक स्पॉट बनले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांची वाढती संख्या ही दुचाकी अपघातांसाठी आमंत्रण ठरली आहे.
---
कोट
उड्डाण पुलाचे काम ७० टक्के झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विनाअपघात आणि वाहतुकीला अडथळा न करता काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- शाम कुणेकर, सहाय्यक अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.