बौध्दिक शिक्षणामध्ये जगण्याचे मर्म
swt214.jpg
99950
कुडाळ ः ''स्वरसंध्या'' कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्रशांत धोंड. सोबत उमेश गाळवणकर, सुंदर गाळवणकर, गुरू देसाई, विठोबा सावंत, अरुण मर्गज, परेश धावडे, कल्पना भंडारी, चैताली बांदेकर आदी.
बौध्दिक शिक्षणामध्ये जगण्याचे मर्म
प्रशांत धोंड ः कुडाळ बॅ. नाथ पै संस्थेत ''स्वरसंध्या'' उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः ज्ञानाबरोबर अंगभूत कलेचा विकास जेथे केला जातो, असे शिक्षण बौद्धिक ज्ञानाबरोबर कलेची दोस्ती व जगण्याचे मर्म सांगून जाते. अशा प्रकारचे शिक्षण देण्यामध्ये बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा हातखंड आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत धोंड यांनी केले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित स्वरसंध्या पर्व-३ ने रसिकवर्ग मंत्रमुग्ध झाला.
श्री. धोंड हे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित स्वरसंध्या पर्व-३ च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते म्हणाले, "संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांची कलासक्ती व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची तळमळ आदर्शवत आहे. संगीत कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे कलागुण उजेडात यावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या दृष्टीने विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीमध्ये संगीत क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींच्या साथीने आपली गायन-वादन कला सादर करण्याची संधी या अशा उपक्रमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. यातून उद्याच्या संगीत क्षेत्रात एखादा तारा चमकून जाईल. त्या दृष्टीने संस्थेला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत."
यावेळी सुंदर गाळवणकर, सौ. गाळवणकर, चेअरमन उमेश गाळवणकर, अमृता गाळवणकर, प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, प्रा. चैताली बांदेकर, प्रा. कल्पना भंडारी, डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, गुरू देसाई, विठोबा सावंत आदी उपस्थित होते.
सचिन कुडतरकर आणि मंदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीएसई सेंट्रल स्कूल, ज्युनिअर कॉलेज ते नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी गायक कलाकारांनी विविध प्रकारच्या गीतांचा समावेश असलेली सुमधुर गीते आपल्या सुरेल व मधुर आवाजात सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. यात तनया तवटे, समीर गावडे, सलोनी खंदारे, चित्रा बोभाटे, सान्वी खवणेकर, सौम्या नाईक, संकेत पाटकर, हिमांशू पेडणेकर, श्रावण मेस्त्री, शमिका सुकी, साक्षी सुभेदार, सानिका वालावलकर, सोनाली जाधव, रिया जाधव, वेदा पाटकर, प्रज्ञा आचार्य, श्री. शुभम, खुशी शिरोडकर, शनाया कुंभार, प्रणिता देसाई, मुग्धा शिरसाट, सिया देसाई यांनी सहभाग नोंदवत हा कार्यक्रम दर्जेदारपणे सादर केला. त्यांना तबला-रजत गाळवणकर, पखवाज-युवराज माधव, गिटार-देविदास नागोळकर, हार्मोनियम-मंदार जोशी, किबोर्ड-महेश तळगावकर, साईड रिदम-भार्गव चव्हाण, ऑक्टो पॅड-सचिन कुडतरकर यांची साथ लाभली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.