स्पर्धांमधून सामाजिक संवेदनशीलता

स्पर्धांमधून सामाजिक संवेदनशीलता

Published on

swt217.jpg
99953
तळेरेः पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना गौरविताना मान्यवर.

स्पर्धांमधून सामाजिक संवेदनशीलता
रेश्मा फाटक ः तळेरेत पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २१ : मुलांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरणपूरकता, संदेशप्रधानता आणि सामाजिक संवेदनशीलता वाढविण्यासाठी गेली पाच वर्षे आयोजित करत असलेली ही पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा म्हणजे मुलांना घडविण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. या स्पर्धेला यावर्षी मिळालेला प्रतिसाद या स्पर्धेची उंची वाढविणारा आहे, असे प्रतिपादन स्पर्धेचे परीक्षक रेश्मा फाटक यांनी व्यक्त केले. तळेरे येथे आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू यांच्या हस्ते झाली. यावेळी परीक्षक उदय दुधवडकर, ऋतू महाडिक, निकेत पावसकर, मिनेश तळेकर, श्रावणी मदभावे, सतीश मदभावे, प्रा. हेमंत महाडिक आदी उपस्थित होते. या स्पर्धेत कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यांतील एकूण ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी तयार केलेले आकाशकंदील पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारे होते. यात व्यसनमुक्त समाज, स्वच्छ भारत, पाणी वाचवा, निसर्गाचे रक्षण, बालशिक्षण अशा विषयांवर प्रबोधन करणारे आकाशकंदील तयार केले होते. हे सर्व आकाशकंदील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाला देण्यात आले.
स्पर्धेचा निकाल असाः लहान गट (पहिली ते चौथी)-श्रुती तळेकर, दुर्वा मेस्त्री, अक्षरा पावसकर, सिद्धांत जाधव, ऋषभ कानकेकर. मोठा गट (पाचवी ते दहावी) - मनस्वी मेस्त्री, संस्कार कुलकर्णी, प्रसन्न सारंगे, उत्तेजनार्थ आयुषी वायंगणकर, आकांक्षा आडिवरेकर, पूर्वा केळुस्कर, आराध्या तळेकर. खुला गट - दीपाली मेस्त्री, शिवानी राणे, शिवानी जाधव. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वारगाव क्र. १ शाळेमधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल सर्व सहभागी स्पर्धक, मार्गदर्शक शिक्षक आणि पालक यांना विशेष प्रोत्साहनपर सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राजू वळंजू, उदय दुधवडकर, ऋतू महाडिक, श्रावणी मदभावे यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com