खेडमधील मिशन नेत्रा ठप्पच

खेडमधील मिशन नेत्रा ठप्पच

Published on

- rat२१p.jpg-
P25N99993
खेड ः शहरात मिशन नेत्रा अंतर्गत बसविलेल्या कॅमेऱ्यांना वेलींचा वेढा पडला असून, अनेक कॅमेरे बंद स्थितीत आहेत.

खेडमधील ‘मिशन नेत्रा’ कोमात
देखभाल-दुरुस्तीअभावी यंत्रणा निष्क्रिय; चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्हेगारांच्या हालचालींवर करडी नजर ठेवता यावी, यासाठी लोकसहभागातून खेड शहरात उभारण्यात आलेला ‘मिशन नेत्रा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखभाल-दुरुस्तीअभावी ठप्प झाला आहे. त्यामुळे गजबजलेल्या भागांत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून खेडची ओळख आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘मिशन नेत्रा’ उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला होता. शहरांचा विस्तार होत असल्याने दिवसेंदिवस वाहतूकही वाढत आहे. एकीकडे पोलिसांचे संख्याबळ कमी, तर दुसरीकडे वाढती गुन्हेगारी हे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये ‘मिशन नेत्रा’अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले होते. यासाठी लोकसहभागातून निधी संकलित करण्यात आला होता. खेड शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. या उपक्रमासाठी दुबई येथील उद्योजक बशीर हजवानी यांनी हजवानी फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत केली होती. मात्र अल्पावधीतच ही यंत्रणा डबघाईस आली आहे.
खेड शहर परिसरातील अनेक कॅमेरे सध्या बंद आहेत. बसस्थानक, निवाचा चौक, गांधी चौक, तीन बत्ती नाका आदी ठिकाणी बसवलेली लाऊडस्पीकर यंत्रणाही धूळखात पडली आहे. यामुळे वाहतूक नियंत्रणही अडथळ्यांत सापडले आहे. या कॅमेऱ्यांच्या आजूबाजूला पावसाळ्यात वेलींचा विळखा पडलेला आहे. या यंत्रणांकडे पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ती सुस्थितीत करावी, अशी आग्रही मागणी खेडवासीयांकडून केली जात आहे.
---
कोट
काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. यासंदर्भात ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे, त्यांच्याकडून आम्ही या यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करून घेऊ. तसेच ‘मिशन नेत्रा’अंतर्गत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाऊडस्पीकर यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करू.
- विकास अहिरे, पोलिस निरीक्षक, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com