दिवाळी सुटीमुळे पर्यटन स्थळं गजबजु लागली
- rat२१p१२.jpg-
P२५N९९९९१
गणपतीपुळे ः येथील किनाऱ्यावर झालेली पर्यटकांची गर्दी.
दिवाळी सुटीमुळे पर्यटनस्थळं गजबजू लागली
समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी; भाऊबिजेनंतर संख्येत होणार वाढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : दिवाळी सणाची धूम सुरू झाली असून पहिल्या दिवशी गणपतीपुळ्यातील श्रींचे दर्शन घेण्यासाठी परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांनी गर्दी केली होती. भाऊबीज झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पुन्हा पर्यटकांची वाढती उपस्थिती पाहायला मिळणार आहे. सध्या किनारी भागांमध्ये पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
दिवाळी सणानिमित्त मिळालेल्या सुटयांमुळे पर्यटकांची पावले कोकणातील पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे मंदिर परिसर आणि बाजारपेठ पर्यटकांनी फुलून गेली आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी गणपतीपुळे येथील सर्व लहान-मोठे पर्यटन व्यवसायिक, एमटीडीसी आणि देवस्थान समिती सज्ज झाली आहे. शनिवारपासून गणपतीपुळे येथे पर्यटकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे तेथील निवासी व्यवस्थापकांनी सांगितले.
गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘मोरया वॉटर स्पोर्ट्स’ संस्थेच्या माध्यमातून बनाना राईड, ड्रॅगन राईड, जेट स्की बोट, डिस्को राईड आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच फोटोग्राफी, बाईक राईड, उंट व घोडा सफर यांसारख्या अनुभवांचाही आनंद पर्यटक घेऊ शकतात. गणपतीपुळे परिसरातील पर्यटकांची वाढती संख्या पाहता येथील व्यावसायिकांची दिवाळी गोड होणार, हे निश्चित आहे.
----
कोट
दिवाळीच्या पहिल्या दिवशी गणपतीपुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. आता भाऊबीज झाल्यानंतर पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतील. त्याचा निश्चितच आम्हा व्यावसायिकांना फायदा होईल.
- किसन जाधव, व्यवसायिक, गणपतीपुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.