कळंबस्ते खड्ड्यात फटाके वाजवून दिवाळी साजरी
- rat२१p२०.jpg-
२५O००००७
चिपळूण ः कळंबस्ते येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात फटाके वाजवताना शौकत मुकादम व कळंबस्ते भागातील ग्रामस्थ.
खड्ड्यात फटाके फोडून दिवाळी साजरी
शौकत मुकादम ः कळंबस्ते फाटा ते धामणंद मार्ग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : तालुक्यात रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याकडे सरकारसह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती शौकत मुकादम यांनी खड्ड्यात फटाके फोडून आपली नाराजी व्यक्त केली. रस्ते विकासासाठी आणलेला निधी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
कळंबस्ते फाटा ते धामणंद रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्तीबाबत नागरिकांकडून मागणी होत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. चिपळूण तालुक्यातील हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. माजी सभापती शौकत मुकादम यांनी रस्ता दुरुस्तीबाबत आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने दिली. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे यंदाची दिवाळी त्यांनी खड्ड्यात फटाके वाजवून साजरी केली. या वेळी कळंबस्ते सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडीक, ग्रामपंचायत सदस्य विवेक महाडीक, शिरीष शिंदे, दीपक शिगवण, पांडुरंग पिलावरे, चव्हाण बुवा, हळदे, अमेय महाडीक, सौरभ महाडीक, विकास जोरवेकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
---
कोट
रस्त्यांची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. आम्ही खड्ड्यात फटाके वाजवून येथील परिस्थिती लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर नागरिक आंदोलन करतील.
- विकास गमरे, सरपंच, कळंबस्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.