कोकणातील पहिला एफएसटीपी प्रकल्प गुहागरात
कोकणातील ‘एफएसटीपी’ प्रकल्प गुहागरात
डंपिंग ग्राऊंडमध्ये उभारणी : परिसर बनणार निसर्गोउद्यान
सकाळ वृत्तसेवा
गुहागर : एचएसबीसी बँक पुरस्कृत सीडीडी इंडिया बेंगलोर या एनजीओच्या वतीने गुहागर नगर पंचायत कार्यक्षेत्रातील डंपिंग ग्राऊंडमध्ये मल गाळ प्रक्रिया केंद्र (फिकत स्लज ट्रीटमेंट प्लांट - एफएसटीपी) उभे केले जाणार आहे. हा प्रकल्प कोकणातील एकमेव प्रकल्प ठरला असून गुहागरबरोबर मालवण येथेही या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.
सीडीडी इंडिया बँगलोर या कंपनीच्या वतीने कोकणातील समुद्रकिनारी पर्यावरण संरक्षणाचे काम सुरू आहे. यातून त्या-त्या ठिकाणी होणाऱ्या वातावरण बदलाचे निरीक्षक व परीक्षण या कंपनीच्या वतीने केले जात आहे. यासाठी एचएसबीसी बँकेतर्फे आर्थिक सहाय्य केले जात असून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. गेले काही महिने गुहागर शहरातील गटार, नाले यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये इ-कोलायचे प्रमाण दिसले होते. यामुळे समुद्र किनारपट्टी अधिक सुरक्षित करण्यासाठी व गुहागर नगर पंचायतीचा घनकचरा प्रकल्प जागा अधिक सुरक्षित असल्याने कोकणातील पहिला प्रकल्प गुहागर येथे उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी गुहागर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, गुहागर नगर अभियंता विजय भूतल, स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव, अभियंता आशिष खांबे यांना बंगलोर येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर गुहागर नगर पंचायतीच्या घनकचरा प्रकल्पामध्ये या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
एफएसटीपी प्रकल्पात मैलापासून खत निर्मितीसह त्यामधून वेगळे करण्यात येणाऱ्या पाण्याचा वृक्ष संवर्धनासाठी वापर केला जात आहे. याची क्षमता प्रती दिन ३ केएलडी असून गुहागर शहरातून संकलन होणाऱ्या शौचालयाच्या टाकीतील मैलाच्या प्रमाणानुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी एन्व्हॉर्मेट इंजिनिअरिंगवर आधारित सोलराईजचा वापर करण्यात आला आहे, जेणेकरून या एफएसटीपी प्रकल्पामधील आणण्यात येणाऱ्या शौचालयाच्या मलावर जास्त उष्णता देऊन त्या मलाची कुजण्याची प्रक्रिया लवकर करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. हनी वॅगनच्या सहाय्याने आणण्यात येणाऱ्या शौचालयाच्या मलापासून सोनखत निर्मिती केली जाणार आहे. तसेच यामधील पाणी फिल्टर करून या पाण्याचा वापर झाडांसाठी केला जाणार आहे.
या एफएसटीपी प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी बँकेच्या उपाध्यक्ष रोमीत सेन, सीडीडी इंडिया बँगलोरच्या आदिती पांड्ये, प्रकल्प व्यवस्थापक इरफान उल्ला शरिफ, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते.
चौकट
सात दिवसांत ७० किलो कंपोस्ट खत
मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी हा प्रकल्प गुहागरमध्ये आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रकल्पात शहरातून जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून सात दिवसांत ७० किलोपर्यंत कंपोस्ट खताची निर्मिती केली. सुका कचऱ्याचे प्लास्टिक क्रश करून ते बाहेर पाठवले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.