रस्त्यालगतच्या विक्रेत्यांना प्रशासनाकडून अभय

रस्त्यालगतच्या विक्रेत्यांना प्रशासनाकडून अभय

Published on

- rat२१p.jpg-
OP२५O००००५
चिपळूण ः शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे रात्री सुद्धा वाहनांच्या प्रचंड रांगा लागत आहेत.

रस्त्यालगतच्या विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीत भर
चिपळूण शहरातील चित्र; प्रशासनाचे अभय, पोलिसांची मात्र दमछाक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : दिवाळीमुळे बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. विक्रेत्यांनीही रस्त्यालगत विक्रीचे स्टॉल मांडलेले आहेत. बाजारपेठेतील गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यालगतच्या विक्रेत्यांना प्रशासनाकडून अभय मिळत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यावर नियंत्रण ठेवताना पोलिसांची दमछाक होत आहे.
कपडे, सोने, सजावटीच्या वस्तू, आकाशदीवे, पणत्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. कपड्यांच्या दुकानांमध्ये तर दुपारनंतर लांबचलांब रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. ज्या दुकानांमध्ये विशेष सवलत आहे, तिथे तुडुंब गर्दी दिसत आहे. शहरातील मोठ्या शोरूमपासून लहान दुकानांमध्येही नागरिकांचा ओघ कायम आहे. याशिवाय रस्त्यावरील विक्रेत्यांकडे खरेदी करणारा वर्गही तितकाच आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही बाजारपेठेत गर्दी होती. एकीकडे लक्ष्मीपूजनाची दुकानदारांची गडबड आणि दुसरीकडे ग्राहकांना सांभाळण्याची कसरत सुरू होती.
सोने महागले असले तरीही सराफ पेढ्यांमध्ये खरेदीसाठी गर्दी होती. दिवाळी आणि लग्न सराईमुळे सोने खरेदी तेजीत आहे. बाजारपेठेमध्ये पूजेसाठी लागणारी फळे, कारीट, आंब्याची पाने, शेवंती, झेंडूची फुले यांची आवक वाढली असून ठिकठिकाणी ग्रामीण भागातील विक्रेते हे साहित्य घेऊन बसले आहेत. चिपळूण शहरात ग्रामीण भागासह इतर तालुक्यांतील ग्राहकही खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणारी गर्दी रात्री ९.३० पर्यंत कायम असते.
-----
चौकट
बाजारपेठेत कोटींची उलाढाल
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी सर्वत्र उत्साहात साजरी झाली. गेल्या चार दिवसांत सजावटीचे साहित्य, किल्ल्यांवरील सैनिक, कपड्यांची खरेदी या माध्यमातून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याच्या मुहूर्तासाठी नवीन वस्तू, वाहन, सोने खरेदीचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली आहे.
----
कोट
सध्या दिवाळीची सुटी आहे. पालिकेत कामगारांची संख्या कमी आहे. त्यामुळे विक्रेत्यांवर कारवाई करताना मर्यादा येत आहेत. सुटीचा हंगाम संपल्यानंतर रस्त्यालगत बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.

- मंगेश पेढांबकर, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com