

कदंबा बसमधून
मोबाईल चोरीस
सातार्डा ः म्हापसा कदंबा बसस्थानकावर पणजी-वेंगुर्ले एसटी बसमध्ये वेंगुर्ले-कॅम्प-भटवाडी येथील नीलेश आरोलकर यांचा मोबाईल चोरला. मोबाईल चोरी करणारी टोळी म्हापसा बसस्थानकात कार्यरत असून, अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. बुधवारी (ता.२२) सायंकाळी वेंगुर्ले येथे जाणाऱ्या एसटी बसला गर्दी होती. अल्पवयीन मुलगा एसटीत ‘आई कुठे आहे’ असा बहाणा करत ‘एसटी’त चढून फिरत होता. लहान मुलगा म्हणून प्रवाशांनी दुर्लक्ष केले; मात्र पाकीट, मोबाईल चोरी प्रकरणे वाढत असल्याने जागरूक प्रवाशांनी मुलाची विचारपूस केली असता मुलाने एसटी बसमधून उतरून पळ काढला.
----
भडगाव मोरीवरील
भगदाड बुजविले
कुडाळ ः पणदूर-घोटगे या राज्य मार्गावरील भडगाव खुर्द रस्त्यावरील मोरीला पडलेले भगदाड बुजविण्यात आले. भडगाव खुर्द गावात दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या रस्त्यावरील मोरीला मधोमध भगदाड पडल्यामुळे वारंवार अपघात होत होते. या मोरीला बसविलेल्या सिमेंट पाईपना कॉलर न बसविल्यामुळे मधोमध खड्डा पडला होता. तो चुकविताना कसरत करावी लागत असे. हे भडगाव सरपंच गुणाजी लोट, उपसरपंच राजेंद्र राणे व पोलिसपाटील यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असता, बांधकाम विभागाचे अधिकारी पवार यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीने भडगाव येथे पाठवून मोरीची दुरुस्ती केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली असून, समाधान व्यक्त होत आहे.
---
प्रांताधिकारी निकम
यांची पुण्यात बदली
सावंतवाडी ः येथील प्रांताधिकारी हेमंत निकम यांची पुणे येथे उपायुक्त, भूमिअभिलेख म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. निकम हे दोन वर्षांपूर्वी सावंतवाडीत रुजू झाले होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकांवेळी त्यांनी या मतदारसंघात चांगल्या प्रकारे कामकाज हाताळले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदरच त्यांची बदली झाली आहे. अद्याप त्यांच्या जागेवर कुणाची नियुक्ती झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.
......................
भालावल येथे
आज डबलबारी
आंबोली ः भालावल येथील सातेरी युवक कला व क्रीडा मंडळातर्फे तेथील सातेरी मंदिर येथे उद्या (ता.२५) रात्री ९ वाजता २०/२० डबलबारी सामन्याचे आयोजन केले आहे. हा सामना श्री वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळाचे (लिंगडाळ, देवगड) बुवा संदीप लोके (पखवाज योगेश सामंत, तबला संतोष सुतार) आणि श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे (वर्दे-कुडाळ) बुवा गुंडू सावंत (पखवाज विराज बावकर, तबला संतोष गोसावी) यांच्यात होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सातेरी युवक कला व क्रीडा मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.