दुर्गवाडीत साकारली प्रतापगडाची प्रतिकृती

दुर्गवाडीत साकारली प्रतापगडाची प्रतिकृती

Published on

-rat२४p१७.jpg-
२५O००१६४
मंडणगड : दुर्गवाडीत साकारलेली प्रतापगडाची लक्षवेधी प्रतिकृती पाहताना दुर्गप्रेमी व परीक्षक.
----
बालकांनी साकारला प्रतापगड
दुर्गवाडीतील बालगोपाळांचे कलाकौशल्य; ग्रामस्थांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २४ ः दिवाळीच्या सणात रांगोळी, कंदील, फटाके, फराळ या पारंपरिक आकर्षणाबरोबरच महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींचेही वेगळे स्थान आहे. याच परंपरेत मंडणगड शहरातील दुर्गवाडी येथील चिमुकल्या बालकांनी शेतातून आणलेल्या माती, दगड आणि धोंड्यांच्या सहाय्याने प्रतापगडाची आकर्षक प्रतिकृती साकारली असून, ही कलाकृती पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
दुर्गवाडीतील हर्षल बैकर, हर्षद बैकर, श्रेयस साळवी, अर्थव साळवी, सोहम भुवड, ज्ञानेश पोस्टुरे आणि ध्रुव पोस्टुरे या विद्यार्थ्यांनी आठवडाभरात ही प्रतिकृती साकारली. पुस्तकातील गडकिल्ल्यांच्या नकाशाचा आधार घेत त्यांनी किल्ल्याची मांडणी केली आहे. तोफा, दारूगोळा ठेवण्याची ठिकाणे, मुख्य दरवाजे, बुरूज, तटबंदी यांचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले आहे. गडाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर विराजमान असलेली प्रतिकृती ठेवण्यात आली असून, सभोवताली मावळ्यांचा पहारा उभा करण्यात आला आहे. गडाची तटबंदी साकारताना वळणदार पायवाटा, टेहळणीसाठी गुप्त ठिकाणे आदी बाबींचे बारकाईने चित्रण करून या बालगोपाळांनी आपल्या कल्पकतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे. दिवाळी सुटीत मुलांनी आपले बौद्धिक आणि कलात्मक कौशल्य वापरून इतिहासाला नव्या रूपात जिवंत केले आहे. या उपक्रमाचे पालक, नातेवाईक तसेच ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक होत आहे. या कलाकृतीमुळे शिवकालीन वैभव आणि मराठी गडकिल्ल्यांचा अभिमान पुन्हा एकदा उजळून निघाल्याचे चित्र मंडणगड परिसरात दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com