संक्षिप्त पट्टा
- rat२४p६.jpg-
२५O००१३०
पावस ः पूर्णगड शाळेमध्ये तयार केलेली किल्ल्याची प्रतिकृती.
----
पूर्णगड शाळेत दुर्गोत्सव उपक्रम
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड शाळेत दुर्गोत्सव उपक्रम उत्साहात झाला. युनेस्कोने शिवछत्रपतींच्या बारा दुर्गांना जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. त्यांना जनसामान्यातून एक अभूतपूर्व मानवंदना देण्यासाठी पूर्णागड नं. १ शाळेने विद्यार्थी व पालकांच्या साह्याने मातीपासून आकर्षक किल्ले तयार करून त्याचे सेल्फी शासनाने दिलेल्या लिंकवर अपलोड करून प्रमाणपत्रे घेतले. या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी या सर्वांचे मोठे सहकार्य लाभले.
-rat२४p१०.jpg-
२५O००१४१
रत्नागिरी ः खल्वायनच्या पाडवा मैफलीत गायन सादर करताना मुग्धा गावकर. शेजारी साथीला प्रथमेश शहाणे, सुहास सोहनी व चैतन्य पटवर्धन.
खल्वायन पाडवा मैफल मुग्धा गावकरांनी रंगवली
रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल गोव्याच्या प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा गावकर यांच्या गायनाने रंगली. स्वरांवरची पकड, दमदार आलाप-तानांनी एकाहून एक सरस गीते सादर करत त्यांनी रसिकांची मने जिंकली. मैफलीची सुरुवात गावकर यांनी राग दिन की पुरियामधील बडा ख्यालाने केली. त्यानंतर राग बागेश्रीमधील एक बंदिश सादर झाली. शास्त्रीय संगीताची पक्की तालीम आणि सातत्यपूर्ण रियाजातून त्यांनी स्वरांवर मिळवलेली हुकूमत आणि उत्स्फूर्तपणे सादरीकरणाने त्यांनी शास्त्रीय संगीतावरील पकड सिद्ध केली. श्री गुरू सारिखा, लागी कलेजवाँ कटार, बगळ्यांची माळ फुले, ताने स्वर रंगवावा या गीतांनंतर हरी म्हणा हरी म्हणा या पदाने मैफलीचा शेवट झाला. सदरहू मैफलीला हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन, तबलासाथ प्रथमेश शहाणे व तालवाद्य साथ सुहास सोहनी यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

