आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने लढू

आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने लढू

Published on

00800

आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने लढू

संदेश पारकर : कणकवलीत ठाकरे गटाची आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २७ : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट ताकदीने उतरेल. जास्तीतजास्त उमेदवार उभे करू, असे शिवसेना जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज जाहीर केले.
शिवसेना ठाकरे गटाची कणकवली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक येथील विजय भवनात झाली. जिल्‍हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा घेतला. श्री. पारकर म्‍हणाले, ‘शिवसेनेला संघर्षाचा काळ हा काही नवा नाही. अशा अनेक संघर्षातून शिवसेनेने पुन्हा भरारी घेतली आहे. त्‍याच आत्मविश्‍वासाच्या पाठबळावर आज इथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. ही निवडणूक आता कार्यकर्ते लढवणार आहेत. त्‍यामुळे कार्यकर्त्यांनी मिळालेल्‍या संधीचे सोने करावे.’
अरुण दूधवडकर म्‍हणाले, ‘कार्यकर्त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याच्यादृष्‍टीने पुढील काळात होणाऱ्या जिल्‍हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. या निवडणुकांत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहोत. त्‍यामुळे कार्यकर्त्यांनी आता जोमाने काम करावे.’
युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, ‘जिल्‍हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्यास सक्षम आहोत. त्‍यामुळे आज कार्यकर्त्यांच्या मागे संघटनेने भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे, संघटना त्याच ताकदीने कार्यकर्त्यांच्या मागे उभी राहिल्यास जास्तीतजास्त उमेदवार हे आपल्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळवून देतील.’
यावेळी उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, देवगड तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, सुनील तेली, दिनेश नारकर, तेजस राणे, वैभव मालंडकर, सचिन सावंत, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, युवासेना वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर, जितेंद्र तळेकर, आशीष मेस्त्री, यशवंत गवाणकर, सूर्यकांत परब, रमाकांत मोरे, जयेश धुमाळे, सुमित राणे, गुलझार काझी, ओमकार इस्वलकर, श्रीकांत गावकर, रमेश राणे, सिद्धेश राणे, सचिन सुतार, नीलेश राणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com