उड्डाणपुलावरचे पिलरवर नेत्यांच्या जाहिराती

उड्डाणपुलावरचे पिलरवर नेत्यांच्या जाहिराती
Published on

उड्डाणपुलाच्या पिलरवर जाहिरातबाजी
विद्रुपीकरण ; निवडणुकीच्या संकेताने रस्सीखेच
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम मागील तेरा वर्षापासून प्रलंबित आहे. उड्डाणपुलासाठी उभारण्यात आलेले पिलर नेत्यांच्या वाढदिवसाची जाहिरात करण्यासाठी हक्काचे ठिकाण बनले आहेत.
मदतीला धावून येणारा, संकटकाळी मदत करणारा, अभ्यासू कार्यकर्ता, आपला माणूस, उगवते नेतृत्व, कामाचा माणूस, हक्काचा माणूस अशी नानाविध बिरुदावली लावलेले असंख्य कार्यकर्ते चिपळूण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडले आहेत. पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाल्यानंतर भावी नगरसेवकांचे फलक उड्डाणपुलाच्या पिलरवर झळकत आहेत. पालिकेची निवडणूक आता दोन-अडीच महिन्यांनी होणार आहे, त्या निमित्ताने गेल्या चार वर्षात कुठेही न दिसणारे हेच कार्यकर्ते आता मतदारांच्या गर्दीत पाहायला मिळत आहेत. शहरातील अनधिकृत बॅनरवर काही दिवसांपूर्वी पालिकेने कारवाई केली. त्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी दिवाळीनिमित्त बॅनर लागल्याचे दिसत आहेत.
गेल्या चार वर्षांपासून प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. विकासकामांची बोंबाबोंब सुरू आहे. रस्त्यावर खडी पडते, गटार तयार होतोय; पण निधी कोणाचा? याची माहिती मतदारांना मिळत नाही. पालिकेकडे तक्रारी केल्या तरी प्रश्न सुटत नव्हते. तेव्हा सांगायचे तरी कोणाला, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. काही ठराविक माजी नगरसेवक, मोजके कार्यकर्ते सोडले तर कोणीही पालिका कार्यालयाकडे फिरकले नाही की, नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक केली नाही; परंतु आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच गायब झालेले तथाकथित सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक आता रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना पाण्याचे, कचऱ्याचे प्रश्न दिसायला लागले आहेत. त्यांनी प्रभागातून फेऱ्या वाढवल्या आहेत. निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या घरी हजेरी लावली.
---
कोट
दहा वर्षांपूर्वी पालिकेची निवडणूक झाली तेव्हा मी पराभूत झालो; पण काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आणले. मी दहा वर्षात शहरात बॅनर लावले नाही; परंतु जनतेत राहिलो. काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून मी जनतेतच आहे. आम्हाला बॅनर लावण्याची गरज नाही.
--लियाकत शहा, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com